पोस्ट्स

कविता - मेरी जीवनसखी

 कविता - मेरी जीवनसखी जीवन की बगिया में टहलते हुए  उसने मेरा हात कब पकड लिया  नही पता चला  कहा से आयी वो  परछाई जैसे मुझपर छा गयी   पर सचमुचमे तो पर परछाई   नही निकली  करपडी संवाद सुबह शाम दिन रात  बोली जो रिश्ता  दिन का सूरज से  रात का चांदनी से  बादल का बारिश से  सावन का झुलेसे  नदी का सागर से  नैया का नदी से  साज का सरगम से  राग का बंदिश से  फुल का सुगंध से  पंछी का चहचहाट से  विहंग का गगन से  बचपन का कहानी से  चेहरे का आईने से  कलम का कागज से  और कन्हैया का बासुरी से  वही रिश्ता हैं मेरा तुझसे  राम प्रहर मे बोली  तू गाता चल गुन गुनाता चल  मै गीत बनकर साथ दूंगी  तेरा निरंतर   - नंदकिशोर लेले

आण मराठीची

इमेज
  आण मराठीची मराठी असे आमुची मायबोली संत कवी गण साहित्यिक फुलवती तिच्या वैभवाचा मळा दाविती शारदीय चंद्रक ळा ज्ञानोबा म्हणती शब्द जैसे कल्लोळ अमृताचे वाचू नित्य ज्ञानेश्वरी, संत साहित्य, शिवबा वीर गाथा उमगण्या तिची मोहक शब्दकळा सहजची मग लागेल तिचा लळा जागवील विवेक , मिळेल स्फूर्ती महती मातृभाषेची उतरेल नव्या पिढीच्या गळा वाचू बोलू लिहू नित्य मराठी राहील मग ती सदा आपुल्या ओठी कधी न लागेल तिला ओहोटी आण आज ही घेऊया समृद्धी...वैभवाची ती खाण आहे किती खोल जाणूया.... संस्कृत भाषा ही जननी साऱ्या भारतीय भाषा तिच्या भगिनी मान ठेऊ साऱ्या भाषांचा भाळी जरी टिळा मराठीचा !

रवीअस्त.....

इमेज
 रवीअस्त मोहितो आम्हां   उठती उदगार अहा....हा  डोळ्यांचे पारणे फेडतो हरदिन हरघडी हर स्थळी रूप नित्य नूतन शशी स्वागता सहज सोडतो सिंहासन    सांगतो संपता कार्यभाग सोडा हे जग आसन सत्वर नका ही थांबू क्षणभर न धरा वृथा अभिमान केल्या कार्याचा.. याहून विरळा काय असे हा निष्काम कर्मयोग भगवद् गीतेचा  दिनभर दिले काम करा नीट     उद्याचा दिवस जाईल नीट  प्रेयसां परि श्रेयस श्रेष्ठ दावितो तो वाट नमितो नंदकिशोर रवी अस्त समयी शशी उदय होईल आता पश्चिमेवरी 

निवडणुकीच्या उंबरठ्यावर....

इमेज
निवडणुकीच्या उंबरठ्यावर.... कुणी निंदा अथवा वंदा टोपी घालणं आणि बदलणं हाच आमचा धंदा घडलं काही विपरीत  की एकमेकांकडे दाखवणं बोटं हीच आमची रीत  तुम्ही बसता बोटं मोडत आम्ही असतो पत्रकारांपुढे बाता झोडत....  सेटिंग कोण कोणाचं करतं ज्याचं त्याला माहीत असतं  समजता का आम्हाला वेडे ... खुळे ... वाटतं तुम्हा चॅनलवरलं आणि पेपर मधलं सारं खरं समजून चालत असतो आम्ही ..छे छे. शाळेत शिकवलं होतं गणितामध्ये अगोदर असतो पक्ष आणि मग असतं साध्य इथे मात्र अगदी उलट राजकारणाच्या गणितात आधी असतं साध्य आणि मग असतो पक्ष आल्या निवडणुका की उत्तम प्रशासन, महिला आणि बाल कल्याण, बळीराजा आदि साऱ्या वर्गाची काळजी ज्येष्ठांसाठी सवलती आणि मोफत बरच काही असं लिहिता जाहीरनाम्यात. पाच वर्षाचा वायदा (बाजार) बहुमोल मत द्याना यंदा  करून देऊ तुमचा फायदाच फायदा ..... टोपी बदलणे हाच आमचा धंदा कायद्यातून पळवाटा काढणं हाच आमचा वायदा.  ओठावर गोड भाषा चेहऱ्यावर लावून फेशियल आणता चेरी हसू ,  कसं.... कसं.... एकदा दिलं ना मत  मग वागू पूछो मत असं  रंग बदलणारे सरडे आणि निष्ठावंत हे (नि)सरडे  निसर्गातील सरडे त्यांची भूक माफ

आकाशीचा अदभूत दिवा.....

इमेज
  (भोपाळ येथील कलियासोत  जलाशय  दिवाळी नोव्हेंबर १३,२०२३   फोटो सौजन्य  शालेय बालमित्र श्री सुनील भिडे सोलापूर) आकाशीचा अदभूत  दिवा... दिपावली प्रकाश पर्व  रविअस्तचली  किती  हे मोहक  भाव साठवले ते उरी अंतरी परि  अपुरे दोन नयन टिपलं छायाचित्र म्हणून  जलाशयी निर्मळ स्वभाव  म्हणून उमटतसे रवि बिंब प्रतिबिंब  म्हणती  सूर्य देव  जलाशया सहन केलास  तू दिनभर माझा तापभार   थांब आता क्षणभर येत आहे शशी लवकर  घेवून शितलभाव   तापत्रय ते तपत्रय हा तुझा प्रवास पाहिला मी जवळूनी  तुझे हे अपार सायास  या कारणे दिला हा प्रसाद   वाट हा सर्वाना तुझा मोद.  सांगतसे हे प्रतिबिंब निसर्गाप्रती ठेवा कृतज्ञ भाव नका ठेवू वृथा गर्व  सर्व ठिकाणी श्रेय घेण्या मीच प्रथम

पोपट दादा ...पोपट दादा ...

इमेज
  पोपट दादा ... पोपट दादा... झोकात असता तुम्ही सदा हिरवा अंगरखा लाल चोच  डौल तुमचा किती छान ! आहात किती दिमाखात  बोटं घातली आम्हीं तोंडात शहाणें तुम्ही फार सोलताय दाणा तुकवत चोच अन मान हरपून गेलं आमचं भान करून खटपट खाताय कणीस किती पटपट   रांगेत बसलेत सवंगडी पहात वाट आहे खात्री तयांना  खाणार नाही तुम्ही कणीस पूर्ण ,           देती असे क्षण  आम्हां             श्रद्धा सबूरी शिकवण  आहात किती तुम्ही गोड गोड येणार ना... रोज रोज... आम्हाला लागली तुमची ओढ आम्हाला लागली तुमची ओढ....

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

इमेज
"  गीतगंगा लिहिणारे अत्रे कोठे आहेत ?त्यांना सांगा, त्यांनी हरवता कामा नये. स्थूल रूपाने ,सूक्ष्म रूपाने पण त्यांनी असायला हवे. आपल्या एकाच व्यक्तित्वात बारा अत्रे आहेत ही माहिती स्वतःअत्र्यांनी सांगितली होती त्यापैकी११ अत्र्यांना बाराव्या अत्र्यांची -केशवकुमार यांची सोबत असली पाहिजे. अत्रे कुठे कोठेही गेले,कोणत्याही स्थानी पोहचले...गीत गंगेचा कलश घेतलेल्या केशव कुमार यांची छाया त्यांच्या बरोबर आहे तोवर सारी गंमत आहे. ती हरवली मग उरले काय ? गृहकर्मी की राजकारणी, सुखशयनी बाजारी.. भ्रमणी ... हरि भजनी की भयानक रणी ही छाया गुप्तरूपाने वावरत आहे तोवर अत्र्यांचे अत्रे पण सदाविकासी राहील."  कविवर्य वसंत बापट आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस  आदरपूर्वक वंदन करून  "फत्तर आणि फुले " ही त्यांची कविता व त्याचे मला सुचलेले रसग्रहण सादर करीत आहे.आपण वाचून आनंद घ्यावा ही विनंती. फत्तर आणि फुले कविता-आचार्य अत्रे काव्यसंग्रह "निवडक केशवकुमार " होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला आनंदी फुलवेल एक जवळी