सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण

सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण जसे फुल फुलताना दिसत नाही तसच प्रेम हे कसं फुलतं हे कळत नाही .पहिली दृष्टादुष्ष्ट- नजरा नजर हीच सुरुवात शुभंकर गाठ बांधते.जसे झाडांवर पहिल्यांदा कोवळी पालवी येते नंतर त्यातून फांदी दिसायला लागते त्याला पाने लागतात नंतर कळी येते फुल येते फळं येतात. प्रेमिकांच्या कधी सारख्या गाठीभेटी होतात तर कधी क्वचित परंतु या प्रत्येक भेटीतला आनंद प्रिया व प्रियकर साठवत जातात. अशाच एका क्षणीक भेटीतील प्रेमभाव या गीतातून प्रियकर व्यक्त करीत आहे. म्हणत आहे की तुझे हास्य किती लोभस आहे सुरा अर्थात मद्य जरी जवळ असले तरी त्याला दूर करून मी तुलाच जवळ करीन .वास्तविक इथे तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध झाला असून ते सौंदर्य हसताना अधिक खुलते आणि मद्यपान केल्यावर जसा माणूस हळूहळू धुंद होतो तशी धुंदी या प्रेमिकाला चढली आहे. गीताच्या दुसऱ्या कडव्यात तुझे लोचन -नयन हे मोहक आहेत आणि तू हसताना ते अधिक मोहक दिसतात जणू चंद्राचा प्रकाश त्यात विलसत आहे असाच भास होतो. आणि त्यामुळेच चंद्रिका म्हणजेच चांदण्या ही तुझ्या नयनावर लुब्ध झालेल्य...