पोस्ट्स

सरस्वती रूप वर्णन कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विनवणी

विनवणी सरस्वती  माते हात ठेव शिरी घडण्या साहित्य सेवा निरंतरी प्रातः समयी विहंग विहार अंबरी किलबिल किलबिल वृक्षांवरी सुमन सुगंध पसरे वाऱ्यावरी भ्रमर प्राशी मध फुलांतरी उमटे दिव्य तरंग, करुंगली विणेवरी अन तू प्रवेशिती प्रतीभारूपी अंतरी स्वानुभवाचे बोल, परकाया प्रवेश उगम अंतरी उचंबळे काव्य, अवतरे सत्वरी नसो गर्व अहंता उरी नको डावे उजवे करि खल  जळू  दे कर्पूरा पूरी हीच विनवणी खरी .....

तुझ्यासम तूच.....

  II   श्री गणेश प्रसन्न  II   II   श्री शारदा  माता प्रसन्न  II   शारदा माता ही वाणीची देवता आहे . समर्थ रामदास श्रीमत दासबॊधामध्ये  दशक पहिला  समास तिसरा यात  लिहितात   II   श्रीराम    II  आतां  वंदीन वेदमाता   I  श्री शारदा ब्रह्मसुता  I  शब्दमूळ वाग्देवता  I   माहं माया  II१II   जे उठती शब्दांकुर  I वदे वैखरी अपार   I  जे शब्दाचें   अभ्यांतर     I  उकलून दावी  II२ II   तर अशी ही शारदा उपासकावर प्रसन्न झाली की काव्य सुचते.   कविता हा  शारदेच्या  साहित्य दरबारातील एक अविष्कार आहे .  या कवितेच्या ओळीतून मी तिचे बाह्यरूप व अंतरंग रेखटण्याचा  प्रयत्न केला आहे.  तुझ्यासम तूच.....  कशी  असते कविता अशी  असते कविता ....  अर्थगर्भाने भरले...