पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑफ पिरीयड

ऑफ पिरीयड शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना ठराविक वेळापत्रकाप्रमाणे विषय शिकवले जातात. विषय वेळ व शिक्षक/ प्राध्यापक यानुसार दैनंदिन अभ्यासक्रम सुरू असतो. काही वेळा मात्र असे घडते की काही कारणांनी नेमून दिलेले शिक्षक/ प्राध्यापक वर्गात येऊ शकत नाहीत. आणि मग अशावेळी तो तास ऑफ पिरीयड म्हणून घोषित केला जातो. शिक्षण घेत असताना एखादा विषय अथवा तो विषय शिकवणारे शिक्षक , त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला आवडत नाही. आणि एखाद्या दिवशी असा नावडत्या विषयाचा पिरीयड जर ऑफ पिरीयड म्हणून घोषित झाला तर विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी चेष्टा मस्करी, टिंगल टवाळी असे उद्योग सुरू होतात आणि हे सर्व घडत असताना एखादे नवीन शिक्षक आपल्या वर्गात प्रवेश करतात मग मुलांच्या गलबला थांबतो आणि आनंदावर विरजण पडते. परंतु काही वेळेस असे ऑफ पिरीयड ला येणारे शिक्षक मुलांशी अगदी वेगळ्याच विषयावर संवाद साधतात, त्यांना बोलते करतात ;मग असा ऑफ पिरीयड मात्र सर्वांनाच आनंद देऊन जातो आणि तो विषय आणि संवाद साधणारे शिक्षक कायम लक्षात राहतात. अशाच एका ऑफ पिरीयड ची ही गोष्ट आहे. सोलापूर इथे दय

जादू मोगरीची ...

जादू मोगरीची ... ऊन कलल्यावर पाठमोरी तू दिसलीस ट्रॅफिक सिग्नलपाशी अबोली साडी , मोहक  केशसंभार अन माळलेला गजरा दरवळला सुगंध आसमंती प्रेम पालवी ऋतू वसंती रेंगाळले मन , नुरले भान  बहरलं  प्रेम अनुरागी ध्यानस्थ मी आणि सावध तू रूपगंधा भरकन निघून गेलीस.....ठेवून अत्तर कूपी हृदयी अजून शोधितो मी जादू मोगरीची ....

सरगम.......

सरगम ....... सहज पाही तुला एकदा मी दर्पणी छेडली  तार, उमटले सूर विराजली तू माझ्या हृदयसिंहासनी रूपगंधा म्हणू की मोहिनी, सुहासिनी म्हणू की पद्मिनी मृगनयनी म्हणू की हंसीनी गमे भासे दिसे न कळे काय जाहले मजला गेलो की मी पुरता  वेडा होऊनी... सारेच किती पाहू आता छायाचित्रांतूनी .... पुरे झाले आता येणे हे स्वप्नी  रूपके किती साठवू नयनी , उरी  अंतरी सत्यात अवतरू दे सरगम सत्वरी...

झुळूक

काल व्हाट्सॲप वर फुलांवरील उत्तम ललित लेख वाचनात आला आणि आणि फुलांच्या आठवणींचा दरवळ मनामध्ये साठवूनच झोपी गेलो. पहाटे अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते हे गाणं ओठांवर आलं . ही पाच कडव्याची कविता असून  या कवितेचे उठावदार वैशिष्ट्य म्हणजे  सदाफुली, शेवंती,चंपक आणि मोगरा या सर्व फुलांचा कविता कडवं गुंफताना उत्तम वापर केलेला आहे. आदरणीय वसंत बापट यांची सेतू या काव्यसंग्रहातील ही नितांत सुंदर कविता आहे. विफल प्रीतीची चित्रं या संग्रहात रंगवली आहेत. या संग्रहातील कवितांचा आस्वाद घेत  असताना खालील कविता मनात उमलून आली. प्रेमात विरह झाला की माणसं विरहावरच प्रेम करतात हेच खरं. झुळूक काल तू ओझरती दिसलीस... मंडईत गं... आणि आठवणींच्या झाडाला मोहोर आला गं... कितीक वर्षांनी तुषार्त  धरतीवर वळीव बरसला गं... अन मृद्गंध आसमंती दरवळला गं... मोगऱ्याचा घमघमाट म्हणलं अडवू तरी अडेल का गं... कुंपणाच्या भिंतीवरून जाई जुईची फुलं बाहेर डोकावतात ना अगदी तसं झालं गं .... , मिटलेल्या वहीतील पानं उगाचच फडफडू लागली गं... तृणपात्यांवर दवबि

जीवन म्हणजे एक नाणं

उंबरठ्यावर दीपोत्सव असताना  अंतर्मनातील   ज्योत पुन्हा एकदा अधिक जागृत करूया म्हणून ही कविता ..    जीवन म्हणजे एक नाणं  जीवन म्हणजे एक नाणं   प्रारब्ध व कर्म बाजू दोन या नाण्याच्या ..  कधी प्रारब्ध उजळविणारे  तर कधी काजळविणारे  जयाच्या हाती प्रारब्धाची  ज्योत  तयाने पसरावा अधिक प्रकाश  जयाच्या हाती प्रारब्धाची  वात तयाने कर्माने  प्रज्वलित करावी ,फुलवावी वातीची ज्योत  हाच संदेश प्रत्येक जन्माचा ज्याचा त्याने उमजून घेण्याचा  शिरीं घेता संत गाथा  नाणं चालतं हमखास , अगदी विनासायास  अन समजतं सुख दुःख  हे फक्त भास आभास ....  भास आभास ... काव्य ३ मे २०१२ रोजी पहाटे  ५. ५० ला सुच लं ..   होतं 

मातृदिन- मातृवंदना

मातृदिन- मातृवंदना जननी जन्मभूमुश्च स्वर्गादपि गरीयसी । जननी व जन्मभूमि स्वर्गाहुन श्रेष्ठ आहे. अशा मातृत्व शक्तीस वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मदर्स डे साजारा केला जातो. मदर्स डे जास्त करून मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. आई हा एक महान शब्द आहे ज्यात सारं काही जग सामावलेलं आहे. आई शब्द उच्चारणं हे अगदी सहजच घडतं. आई शब्द उच्चारताना आपले दोन ओ ठ ही मिटावे लागत नाहीत. आई हा शब्द उच्चारताच तो हुंकार अथवा तीची आठवण येताच आईच्या हृदयाला तो लगेचच जाऊन भिडतो. प्रकाश वेगापेक्षाही अतिजलद असा हा वेग नसून आवेग आहे. आईच्या प्रेमाची शक्ति अगाध असून त्याचे प्रत्यंतर हे लगेचच येते . ज्याप्रमाणे झाडावर फुल फुलताना कोणी पाहू शकते का? त्याची एक वेगळी गती असते तद्वतच आईचे प्रेम ही नित्य फुलतच असते . आईचे वात्सल्य कधीही कोमेजत अथवा आटत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मातेस सर्वाधिक महत्त्व आहे .पृथ्वी वर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपला सांभाळ करत असते म्हणूनच सकाळी उठल्यावर ज्या भूमीवर आपण पाऊल ठेवतो तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा श्लोक