पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य यांची स्वाक्षरी घेण्याचा साहित्य वाचनाच्या छंदामुळे अनेक मान्यवर साहित्यिक मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचे, त्यांना ऐकण्याचे योग माझ्या आयुष्यात येत गेले. असाच एक योग म्हणजे बँकेमध्ये  २००६  साली वाशी- नवी मुंबई मध्ये नोकरीस असताना कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित  कवी "बी - ( श्री नारायण मुरलीधर गुप्ते )"  यांच्या कवितांच्यावरील एका विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राह्यचं भाग्य मला लाभलं.  श्री शंकर वैद्य हे  कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी  होते. कार्यक्रमात  नामवंत कवी अरुण म्हात्रे, सतीश केळुसकर अशोक बागवे आदी मंडळीचा सहभाग होता. कवी बी यांच्या अनेक उत्तम  कविता- चांफा   बोलेना  चांफा   चालेना …  चांफा या अत्यंत गाजलेल्या कवितेसह  माझी कन्या,   गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या आदी  कवितांचा  वाचनात समावेश होता असं आठवतं .   त्या कवितांची गुण वैशिष्ट्ये ही  सांगितली गेल्याने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली . अधून मधून मंद हास्य करत वैद्य सर कवितेतील विशेष भावलेला अर्थ याविषयी टिप्पणी करत असत. "फ

मनमोर ....

इमेज
  मनमोर .... सकाळचे सात वाजले होते आजी आजोबा हॉलमध्ये चहा पीत बसले होते. आजोबांचा चहा झाला आणि ते पटकन उठले आणि कॅलेंडरचं पान बदलून जून महिना आणला.... आजी: किती उकडतय ना... आजी पुटपुटली आजोबा :काल पाऊस पडला की आजी: वळवाचा पाऊस होता तो ...पावसाळा ७ जूनलाच सुरु होतो आजोबा: अग ऋतुचक्र बदलय सारं ..... आजी: यावर्षी पाऊस नॉर्मल आहे बरं का ....कालच बातम्यात सांगितलं आजी-आजोबांचा संवाद सुरू होता तेवढ्यात ' नाच रे मोरा आंब्याच्या वनात' रेडीओवर गाणं लागलं ... सुहास ते ऐकण्यात तल्लीन झाला होता आणि चहाचा घोट घेणं सुरू होतं एवढ्यात छोटी मनू उठून आजीला येऊन बिलगली ... म्हणाली... आजी गं या वर्षी तरी तु मोर दाखवणार ना नक्की खराखुरा... मोबाईल मधला नकोय मला... आजी: हो ग मने.. नक्की दाखवणार. मोराच्या चिंचोलीला घेऊन जाणार आहे मी तुला...आजीने प्रश्नार्थक चेहऱ्याने आजोबांकडे पाहिलं. आजोबा उठले.. . पटकन मोठा पांढरा कागद आणि पेन्सिल घेऊन आले आणि सुंदर नाचणाऱ्या मोर लांडोर जोडीचं चित्र काढलं ...मनू पटकन रंगीबेरंगी पेस्टल कलर घेऊन आली आणि मोराचा पिसारा हा हा म्ह