पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रह्मचैतन्य मूर्ती

इमेज
श्री सरस्वती देवी प्रसन्न ब्रह्मचैतन्य मूर्ती अवतरली गोंदवल्यात ब्रह्मचैतन्य मूर्ती होऊनी नामा वतार .... थोर महाराज, कीर्ती अपरंपार गात गात नाम महिमा श्रीराम जय राम जय जय राम जनासी दिला बहुत आधार लाविला कल्पवृक्ष नाममहिमेचा छाया धरण्या सर्वांवरी फुले तयांची अखंड पडती भक्तद्वारीं  आशिर्वच म्हणुनी दैनंदिन प्रवचनाची फळे रसाळ, पोसती आम्हा भक्तजनां पुरवी जीवनरस , रक्षिती तारती या भवसागरा ऊर्जा देती अखंड जीवन कंठाया वर्णावी किती ती थोरी अपुरी पडे शब्दसंपदा भारी !

दृष्टी

इमेज
२ ००९ ते   २०१३ या काळात   मुंबई   इथे     नोकरीस जाताना कधी ताडदेव तर   कधी पेडर रोड मार्गे कफ परेडला   बसने  जात असे  . हाजीअली चा स्टॉप गेल्यावर  पेडर रोडवर   लता मंगेशकर यांचे घर दिसे. पुढे मुकेश अंबानी यांनी बांधलेली टोलेजंग इमारत पाहायला मिळे.  परुंतु    ताडदेव मार्गे जाताना   जुन्या काळातील    एक देखणी   इमारत   व तिच्या   स्वागत  दारी उभी  एक मनोहारी गुलाबी बोगनवेल   सकाळच्या  वेळेस  डोळयास सुखावून जाई-  जणू सोने पे सुहागाच असेच सारे दृष्य .   सदर    इमारत व्हिक्टोरिया     मेमोरियल अंध शाळेची    आहे . ही   इमारत बघून मन हरखून जात असे   पण एवढी सुंदर इमारत व ती सुंदर बोगनवेल    त्या शाळेतील   मुलांना ती अंध   असल्यानं    पाहता येत नाही याची मनाला खंत वाटत असे  .  त्या विचारातूनच एक काव्य सुचले होते ते असं आहे   दृष्टी अंध शाळेची इमारत सुंदर स्वागत दारी  बोगन वेलीची कमान सुखवी नयन  आणि  हरखून  टाकी मन बघण्याची आहे  साऱ्यांना मुभा ( बघण्याची आहे खरंच का साऱ्यांना मु

कवितेच्या अंगणात - पुस्तकातील खूण

कवितेच्या अंगणात -   कवितेचा   आनंद   आपण   अगदी   बालपणापासून   घेत   असतो. आईच   व   बाळाचे   जसं   चिरंतन   नातं   असतं,   तसंच   कवितेचे   व   आपलं   नातं   ही   चिरंतन   असतं .  लडिवाळ    अशा    अंगाई   गीतातून   ती   प्रथम   आपल्या   अंतरात   प्रवेश     करते. लहानपणी    बडबड   गीत,     पाठ्यपुस्तकातील   कविता ,  पहाटवेळी   ऐकू   येणारी   भक्तीगीते ,  भूपाळी ,    अभंग  अशा   रूपातून   ती   भेटत   राहते   तर   प्रौढपणी   वृत्तपत्रांची   रविवार   पुरवणी ,  दिवाळी    अंकातील   कविता ,    काव्यसंग्रह  तसेच   काव्य   संमेलन   यातून   आपली   व   कवितेची   मैत्री   वाढत   जाते.    " फिरे   रात्रंदिनी   अवनी   सुखदुःख   भिडे    हृदयी ,  उसंत   मिळता   अवतरे   कागदावरी   "  या   प्रक्रियेतून   कवी   व्यक्त   होत   राहतो .  आसपासचा     सुखदुःखाच्या   विविध    अनुभव   छटा  ,  मानवी   भावभावनांचा   खेळ ,  निसर्गातील   आविष्कार    कधी    स्वानुभव    तर    कधी   परकाया   प्रवेश   असं   सर्व   काही   कवितेतून   उमटत   जातं.  जसं घरासमोरील अंगणात अथवा गच्चीत आल्यावरच आप

शब्दांची आरास .....

// श्री शारदा देवी प्रसन्न // शब्दांची आरास ..... मांडली शब्दांची आरास तव पूजेस्तव, होऊनी सर्व कवीगण उपस्थित शब्द हेचि भाव, शब्द हेचि गंध शब्द हेचि फुले शब्दांचाच घंटानाद शब्दांचेच निरांजन तुला ओवाळण्या एका पूजा अशीही की प्रसाद प्रथम अन पूजा नंतर साधन अन साध्य यात न उरले अंतर काव्य जन्मले हा शारदे तुझा प्रसाद आता ही अशीच शब्द पूजा ,शब्द माला अखंड बांधितो मी ,आनंदात राहतो मी तुझिया कृपेने शब्दा शब्दात भरून , तू राहिलीस तरीही उरून असे अखंड अगाध अक्षय पात्र ,जो जो करितो साहित्यसेवा तो तो यास पात्र नमितो नंदकिशोर शारदे माते अर्पितो तव चरणी हे शारदा स्तवन...