पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाई घरा आल्या ...रसग्रहण

गाई घरा आल्या    घणघण घंटानाद   कुणीकडे घालूं  साद गोविंदा रे ?   ‘ गाई घरा आल्या ’ ही   कवी वा गो मायदेव यांची   एक अर्थवाही करूण भाव व्यक्त करणारी कविता आहे. शेतीवाडी , घरदार गाई गोठा ही खेडेगावातील समृद्धी .गाई म्हशी हे दूधदुभतं देणार पशुधन. अशाच एका समृद्ध घरात संध्याकाळ झालेली आहे. गाईगुरांच्या परतीची वेळ झाली आहे. घर मालकीण माऊली त्यांची वाट पाहत आहे.गुराख्याच्या संगीतीने चरावयास गेलेल्या सर्व गाई हळूहळू परत येत आहेत , गाईच्या गळ्यातील घंटेचा नाद अंगणात , गोठ्यात घुमत आहे. आता सर्व गायी परतल्या , मात्र गोविंदा(गुराखी )परत आलेला नाही. त्याची वाट पाहत ती आता काळजीग्रस्त झाली आहे. त्या माऊलीच्या जिवाची घालमेल सुरु आहे -का आला नाही गोविंदा? केव्हा येईल ?या विचारात ती पडली आहे. या परिस्थितीचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्या माऊलीची जितकी माया गाई गुरांवर आहे तितकीच माया त्या गुराख्यावरही आहे. हा कान्हा गुराखीच त्या गुरांना सांभाळत आहे .त्या गुरांना त्या मुक्या जनावरांना त्याने माया लावलेली आहे .त्याच्या बासरीतील मंजुळ ध्वनीच्या लयीत ती निवांत चरत असतात आणि तो आहे साथील

सृजनाचा मोहोर....

इमेज
  मधुकोश संकुलातील सांस्कृतिक वातावरण आणि पर्यावरण हर्षदायी आहे. दिनभर वृक्ष फुलझाडे दृष्टीस आनंद देतात कधी हवाहवासा वारा तर कधी हलकीशी झुळूक व त्यावर बागडणारे पक्षी आणि खारुताई यांचे मंजुळ आवाज कान तृप्त करतात. दुडूदुडू धावणारी बाल गोपाळ मंडळी, त्यांच्या बुटांचा गमीतीदार आवाज , सायकल शिकणं ,थोड्या मोठ्या मुलां मुलींचे नाविन्यपूर्ण खेळ ,धावा धावी- लपाछपी , कधी मांजर आणि लाडका कुत्रा या पाळीव प्राण्याशी मुलांचा संवाद. असा आनंदाचा ठेवा आबाल वृद्ध एकंदरीत पहाटे ते सायंकाळ पर्यंत सर्वच रहिवासी येथे लुटत असतात. असं दिवसभर नादमय वातावरण निसर्गाविषयीची कृतज्ञता आपल्या मनात जागी करतात. हे सार वैभव अमूल्य आहे. ऋतू बदल घडत असताना निसर्गातील मनोहरी विभ्रम आपल्याला या परिसरात पहायला मिळतात. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त याची मजा तर काही औरच. एकंदरीत या सर्वांमुळे तनमन प्रसन्न होते; चित्तवृत्ती फुलून येतात. आणि आता तर ऋतूंचा राजा वसंत याचे राज्य सुरू आहे. मागील आठवड्यात सकाळच्या वेळी फेरफटका मारताना आंब्याच्या झाडांवरील मोहोर दृष्टीस पडला आणि मन मोहरून गेले. मोबाईल मधून