पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवितेचं गाणं .....

कवितेचं गाणं होतं म्हणजे काय होतं ? चित्रकार चित्रात रंग भरू लागतो मुर्तीकाराने बनवलेल्या मूर्तीला टिळा लावला जातो धरतीवर प्राजक्ताचा सडा पडतो  अत्तराची कुपी उघडली जाते मोराचा पिसारा फुलू लागतो वातीचे ज्योतीत रूपांतर होत स्थितीला गती प्राप्त होते क्षण भर कां होईना , क्षण भर कां होईना जिवा- शिवा ची गाठ पडते, जिवा- शिवा ची गाठ पडते

फळा - Black Board

फळा  - Black Board फळा म्हटलं की आपणास शाळा कॉलेजचे दिवस आठवतात. परंतु याच फळ्याचा पुनर्प्रत्यय आमचे अपार्टमेंटमधील रहिवासी शाळेत न जाता दररोज  घेतात. हा फळा आहे मधुकोष अपार्टमेंटमधील गोखले काकूंचा. हा फळा अपार्टमेंट मध्ये राहायला आल्यापासून गेली सहा वर्ष काकू नियमितपणे  लिहीत आहेत. हा फळा आमच्या अपार्टमेंट मध्ये फारच लोकप्रिय आहे .विशेष म्हणजे  फळ्यावर अगदी दररोज नवीन लिखाण वाचायला मिळते. फळ्यावरील मजकूर व हस्ताक्षर दोन्ही गोष्टी  लक्ष वेधून घेतात.  या लिखाणास कोणत्याही विषयाचे बंधन नाही हे एक मनमुक्त लिखाण असते कधी कविता, कधी पाकक्रिया, कधी सुंदर कोटेशन्स,   कधी सणांविषयी आगळी माहिती, कधी जगातील छोट्या परंतु वेगळेपण जपणार्‍या देशांची थोडक्यात माहिती -बहुतांश मराठी तर कधी हिंदी व इंग्रजीत हा मजकूर  लिहला जातो .  असा एक प्रकारचा मनोहरी कोलाज या फळ्यावर आपल्याला वाचायला मिळतो. हा उपक्रम त्यांना स्वतःला व वाचकांना एक वेगळाच आनंद देतो. हा फळा अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर असल्याने सहजच प्रत्येकाच्या दृष्टीस पडतो. अपार्टमेंटमधील सर्व लहान थोर मंडळी, येथील रहिवासी मंडळीकडे येणारे

काव्यधून ...

इमेज
मकरसंक्रांत अंगणात आली असताना  कुर्डुवाडीत  व सोलापूर येथे    लहान असताना रात्री सर्व आवराआवर झाल्यावर  ती.  आजी  व आई  छोटया लोखंडी  शेगडीवर   देखणा  गोड हलवा बनवत असत   याची आज आठवण  येत आहे . त्याच  हलव्याच्या स्नेहातून   उमललेली आणि   काना मनात  ऐकलेली, साठवलेली  काव्यधून .. //श्री शारदा  देवी प्रसन्न // काव्यधून  कविता म्हणजे सहजता  जसा खळखळणारा झरा , आल्हाददायक  पहाटवारा , टपटप पडणारा प्राजक्ताचा  सडा  पिंपळ  पानांची  सळसळ , जाई जुईचा दरवळ , पहाटेचे पक्षीगान ,   पावसाची  रिमझिम  विजेचा  लपंडाव   इंद्रधनूच प्रगटणें , थंडीतील धुक्याची चादर , सकाळचं    कोवळं ऊन चैत्रातल टिपूर   चांदणं पत्नीच आलेलं पहिलं पत्र पत्नीस घातलेला १ ला गजरा  लहानग्याचे हास्य  अन   दूड  दूड  पळणं वृध्द माता पित्याचें पाठीवर फिरणारे ,थरथरणारे हात आणि डोळ्यातील ओसंडणार वात्सल्य  कविता म्हणजे सहजता...खूप दिवसाने झालेली  मित्राची  भेट , वाड्यातील  शेजाऱ्याची  भेट ,  रसिक हृदयी  भीडणारी  कलाकृती ,  कानावर  आलेलं  गा

Life tune….

Poems are important part of my life.. I have tried to put my feelings about Poem in my Poem titled  Life tune…. I have walked so many miles…and I don’t know how many miles are yet to go. I wonder how she caught my hand and partnering me as shadow.   Oh.! .. No … It’s not shadow…as she speaks with me day in and day out . Be it a Winter, Spring or  Autumn. She is all weather partner.   The relation is really amazing indeed ! It’s like what  S unlight is to trees,  Fragrance is to flowers River is to the Ocean,  Chirping is to the Birds,  Cord is to the Guitar,  Melody is to the song, Mirror is to the face,  Story is to the childhood and Pen is to the Notebook... Isn’t it ?  No wonder, it is invisible hand of Poem which is making my life worth living for. Oh !…Really it is tuning my life. She wakes me up with her tunes and  takes me to sound  sleep as well.

मला भावलेले ‘’ भावे साहेब “

मला भावलेले ‘’ भावे साहेब “ ऐ एस भावे अशी चटकन लक्षात येणारी  फोर्ट मुंबई शाखेकडून GA 72 वरील TT पाठविल्याची  इग्रजी सही हिच माझी व साहेबाची अप्रत्यक्ष ओळखं इचलकरंजी मुख्य शाखेकडे असताना १९८२-८३ साली श्री ओळकर साहेबांनी करून दिलेली. या शाखेकडे दररोज एकतरी व  काही प्रसंगी दोनवेळाही TT Sent Rs. Ten lakh  - Bhave असा telegram येत असे. नंतर सातारा येथे काम करत असताना सातारा  प्रादेशिक कार्यालायाकडून कडून येणारी बहुतांशी पत्रावर  त्यांचीच सही असायची  हे पाहिलेले आहे. सातारा येथे आल्यावर हे व्यक्तिमत्व कळू लागले. कामावरील निष्टा, सचोटी ,कडक पण संयमित स्वभाव व व्यक्तिगत हितापेक्षाही संस्थेच्या हिताची जपणूक, मृदू बोलणे व विनोद झाला असता खळी पडत असलेले हास्य आजही डोळयासमोर उभे राहते. सातारा येथील चिरमुले  निकेतन हि United वेस्टर्न बँके असलेली इमारत “दगडी बँक”- (Bank having sound Foundation)  म्हणुन ओळखली जात असे . अशा बँकेस भरभक्कम करण्यात श्री. भावे साहेबासारख्या व्यक्तीचाच  फार मोठा वाटा होता. १९९६-९७ साली computer क्लासला D R साहेब,  ठकार साहेब व आमचा C&IC चा चमू अशी सकाळी ६ मह

वारकरी ...

इमेज
वारकरी ...  आषाढ आणि कार्तिक  महीना व पंढरीची वारी हे  समीकरण  अगदी बालपणापासून साऱ्या महाराष्ट्राच्या जना  मनात घट्ट रुजलेलं  आहे . देवाशी एकरुप होणं याला तल्लीनता  लागते  व ती समूहरूपात वारीत आपण पाहतो , अनुभवतो. साहित्यसेवा तसेच विविध कला माध्यमातून माणसाचं व्यक्त होणं यातही एक प्रकारची तल्लीनता असते, तादात्म्य असतं. एक आत्मानंद मिळत असतो. कवी, लेखक अथवा कलाकार हा कलेमध्ये नेहमीच मशगुल असतो. बाह्य जगात जरी तो वावरत असला तरी अंतर्मनात एक प्रकारची प्रक्रिया अनुभव घेणं , टिपणं आणि अवलोकन सुरू असतं . तो साहित्य पंढरीचा अथवा कला पंढरीचा एक वारकरीच असतो.  सगळीकडे राम कृष्ण हरि पांडुरंग हरि असा  विठुरायाचा गजर सुरू असताना  मनी आलेले भाव  या कवितेत शब्दबद्ध केले आहेत. चंद्र चांदण्यात  विहंग गगनात  मत्स्य पाण्यात  चाल गाण्यात    घुंगरू पायात   नाद वेणूत   गंध सुमनात   मध फुलात गृहिणी  संसारात  बाळ  पाळण्यांत  ममता  माय  ह्रद्यात  शेतकरी शेतात, कामकरी  कामात   जीवनचक्र अव्याहत  शोधी  काव्य जीवनात   जसा वारकरी सदा पंढरपूरात !

सद्गुरु

सांसारिक माणसं दैनंदिन होईल तेवढी देवाची उपासना ,आराधना करीत असतात . सकाळी व संध्याकाळी काही जमलं नाही तरी निदान देवास ,गुरुमाऊलीस नमस्कार हा केलाच जातो. सद्गुरू हे नित्य साधक/शिष्य यासोबत अदृश्य सावलीप्रमाणे असतात व त्यांच्या पाठबळावरचं सामान्य माणसं दिनक्रम सुरु करतात . हा श्रध्देचा व अनुभूतीचा भाग आहे. अशा सद्गुरुं विषयी कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठीच गुरूपौर्णिमा साजरी केली जाते .... एकदा प्रातःसमयी ब्रह्मचैतन्य गोंदेवलेकर महाराज यांना नमस्कार करीत असता काव्यपंक्ती सुचल्या ... त्या अश्या सद्गुरु प्रातःसमयी डोळे भरुनी पाहतो कर जोडुनी, होऊन तल्लीन साठवी अंतरी साजिरे रुप मागतो 'शांती समाधान 'माधुकरी दिन भरासाठी सायंसमयी साद पुन्हा घालितो चरणी ठेवून माथा... क्षणार्धी कसा दिन भरचा जाई क्षीण न कळे आम्हा नाथा ... सद्गुरू समर्थ कृपेचा सागर शिष्या देई साथ निरंतर, होवूनी नौका पार कराया दुस्तर भवसागर !

तुझ्यासम तूच.....

  II   श्री गणेश प्रसन्न  II   II   श्री शारदा  माता प्रसन्न  II   शारदा माता ही वाणीची देवता आहे . समर्थ रामदास श्रीमत दासबॊधामध्ये  दशक पहिला  समास तिसरा यात  लिहितात   II   श्रीराम    II  आतां  वंदीन वेदमाता   I  श्री शारदा ब्रह्मसुता  I  शब्दमूळ वाग्देवता  I   माहं माया  II१II   जे उठती शब्दांकुर  I वदे वैखरी अपार   I  जे शब्दाचें   अभ्यांतर     I  उकलून दावी  II२ II   तर अशी ही शारदा उपासकावर प्रसन्न झाली की काव्य सुचते.   कविता हा  शारदेच्या  साहित्य दरबारातील एक अविष्कार आहे .  या कवितेच्या ओळीतून मी तिचे बाह्यरूप व अंतरंग रेखटण्याचा  प्रयत्न केला आहे.  तुझ्यासम तूच.....  कशी  असते कविता अशी  असते कविता ....  अर्थगर्भाने भरलेली, सुख दुःखाचं वस्त्र ल्यालेली, भाळी शब्दगंधाचा  टिळा ,  भाषा -अलंकार परिधान  केलेली , नित्य नूतन रूप धारण करणारी , धरती  आकाशाच  नातं जोडणारी , जनमानसाची, रसिकांची साहित्य लालसा जोपासणारी , रसिक दरबारी येण्यास आसुसलेली , स्वरांना लोभविणारी, फुलांना सुगंधाविणारी , आत्मभान जागविणारी , कार्यप्