पोस्ट्स

चित्रकाव्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शाश्वत

इमेज
श्रीमत्  दासबोध, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने , आदरणीय फडके शास्त्रीकृत सद्गुरु लीलामृत उपासना ग्रंथ यांची शिकवण अन् आदरणीय दादा (श्री पद्माकर बोंडाळे ) यांचे सतत मार्गदर्शन, प्रबोध यातून अवतरले हे काव्य सांगण्या....   या जगी  काय शाश्वत अश्वाशत  काय असे शिष्य सदगुरू लक्षण कसा होई जीवन मार्ग उन्नत सुलभ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध होय जाण  करुनी आदर भावे सर्वां सदा प्रणिपात श्रीराम चरणी अर्पण  न्यून ते करून घ्यावे पूर्ण  🙏🙏    विश्व व्यापारा नाही गणती  सहज सुंदर प्रेमभाव नसे मिती. तोल मोल असे सर्वांसी  मुके जीव आपणा सांगती,  पुढें करावा हात, मिळतील मग बहु सांगाती असे होत होत मिळते सद्गती आणि नरदेह मिळती   उन्नत करण्या हा नरदेह साधनात साधन  ते उत्तम नामस्मरण  वासना बीज भाजे जाळे  देव कोण मी कोण कळे अन् आकळे  भ्रांती सर्वथा पळे ,   परीस स्पर्श होता  लोह होई सुवर्ण   परि इथे शिष्य गुरू न भेदाभेद सद्गुरु करती आपणासारखे तत्काळ,   जरी आपण असे अनन्य ...

बिंब प्रतिबिंब.....

इमेज
 बिंब प्रतिबिंब दृश्य बहु मनोहर.....  हे खरं की ते खरं...   भास आभास  सारा मायेचा खेळ,  जड ,चंचल, आणि निश्चळ  संत दाविती भेदाभेद  साधती योग्य मेळ * काव्य उमले फुले हेचि समर्थ वांग्मय अभ्यासाचे फळ अर्पण करतो सदगुरू चरणी होण्या सुफळ. * या ओळीचा गर्भितार्थ मानत मानत शिकवावे , संत सज्जन यांचा जन्म हा मानवांचा उद्धार करण्यासाठी झालेला असतो. आपण  ज्ञानी मोठे असलो तरीही ते स्वतःला सर्वसामान्य असे दाखवतात कारण त्यांना लौकिकातच राहून कार्य करावयाचे असते.  मानत मानत शिकवावे  बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध  उद्धरीत जावे सकळजना  असे त्यांचे कार्य असते.  संत नि:स्पृह असतात त्यांची  लक्षणे दासबोध यांत सांगितली आहेत  (  दशक १४ समास १ अखंड ध्यान नि:स्पृह लक्ष्मण नाम). Photo courtesy-   सारे फोटो हे चंबळ नदी परिसर , अभयारण्य  डॉक्टर घनश्याम बोरकर. डॉक्टर, निसर्गप्रेमी, संत साहित्य गाढे अभ्यासक प्रतिभावंत कवी, साहित्यिक, उद्योजक असे बहुआयामी मनस्वी व्यक्तिमत्व आहे.  त्यांची ओळख माझा सोलापूर येथील दयानंद कॉलेज...

दवबिंदू......

  दवबिंदू निसर्ग अविष्कार सौंदर्य  व्हिडिओत लोभस टिपलं आहे .. ज्येष्ठ बंधू श्रीकांत यानं (now on USA tour) मी मोहून गेलो.... काव्य सुचेल असे वाटू लागले  मग पहाटे ते अवतरले ते काव्य     दवबिंदू...  सोनेरी पिवळे, तांबूस तुरे तोलून धरती दवबिंदूस दवबिंदू म्हणती तुऱ्यास  अणकुचीदार तरी सहन करता भार  तुरे म्हणती कसला भार  आम्ही नार... तू सरदार! खुलवीसी सौंदर्य अमुचे  म्हणूनी  वाट पहातो  तुला झेलण्या तासन् तास.. असे मैत्र फुले डोले  दिलखुलास..   तोशीस घेऊन स्नेह जपणे  शिकवी निसर्ग आम्हांस असे संवाद पडण्या कानी   जावे नित्य पहाटे फिरण्यास  डोळ्यांचे कान करून करावे थोडं बोलके मौनास...               करावे थोडं बोलके मौनास......

प्राजक्त सडा......

इमेज
  काल  युनायटेड वेस्टर्न बॅंकेतील सहकारी व उत्कृष्ट फोटोग्राफर श्री विजय देसाई यानं सावंतवाडीला त्याच्या सासुरवाडीला गेला असता पहाटे प्राजक्त सडा टिपला कॅमेऱ्यात.... त्यावरून मला सुचलं हे चित्रकाव्य। प्राजक्त सडा...... १ झुंजू मंजू होत होतं  कोंकण देशी     मारत होतो     बागेत फेरफटका   कोकणची लाल माती बरंच काही सांगत होती  गोठयातील गाय वासरू हाबरंण, मायेने अंग चाटणं गळयातील गोड घंटा नाद  दाजी आणि ताय  काढती धारा झुरू मुरू   पितळी चरवी अन कासंडीत विहंग कूजन , राउळी भक्ती गीत सूर , सुखावून गेले कान  हलकासा पहाटवारा  करी उत्साही तन  तृण पानांवरी अवतरलं दव  हरखून गेलं मन, नूरलं भान   प्राचीवर अरुणोदय पडला सडा प्राजक्ताचा बागेत करण्या रवीचे सहर्ष स्वागत  अशी निसर्ग रंगत संगत  बसलो न्याहळत ... क्षणार्धी जुळती हात  टिपू शकलो काहीच क्षणचित्रं... सारे सारे  साठवले  मनगाभाऱ्यात... मनगाभाऱ्यात...   ######## प्राजक्त सडा...... २ पाहुनी हा प्राजक्...

कान्हूल्या....

इमेज
  कान्हूल्या.... सोनूल्या ...माझा कान्हूल्या नितळ कांती कुरळे कुंतल हाती मनगटी पायी वाळे कानी शुखंल कुंडल गोड गोबरे गाल परी लोभस अधिक ती जिवणी... पाय दुमडता भासशी तू देवघरीचा रांगडा कृष्णकान्हा नेत्री कोवळं कुतुहूल.... सागरतीरी न्याहळी स्व रूप जळ निर्मळ तू निर्मळ लडिवाळा ... भविष्यकाळ तुझा उज्वल