स्वरमयी प्रभा-
// श्री सरस्वती माता प्रसन्न // स्वरमयी प्रभा- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २६ जानेवारी २०२२ च्या पूर्वसंध्येस "पद्मविभूषण " पुरस्कार जाहीर झाला. एक महान गायिका, अतिशय समर्थ शिक्षिका, संगीताच्या अभ्यासक, लेखिका व कवयित्रीही असं दिव्य प्रतिभेचं लेणं ल्यायलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विदुषी स्वरयोगिनी प्रभा अत्रे . सामान्य माणूस ज्याला शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही तो ही त्यांच्या मारुबिहाग ,कलावती व मिश्र खमाज मधील कौन गली मोरा श्याम ही ठुमरी असलेल्या प्रसिद्ध ध्वनिमुद्रिकेतील स्वर कानावर पडताच अंतर्मुख होतो . या ध्वनिमुद्रिकेस अमाप लोकप्रियता लाभली आणि आजही जवळजवळ पन्नास वर्षे ती तशीच टिकून आहे.जेव्हा जेव्हा रागांवर आधारित गाण्यांचा विषय निघतो त्यावेळी कलावती आणि मारुबिहाग हे नाव निघताच डॉक्टर प्रभा अत्रे हे नाव ओठावर लगेच येते. 'प्रथम तुझं पाहता' हे मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत अथवा' दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी' अशी गाणी ऐकली की ती कलावती या रागावर आधारित गाणी आहेत असं शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहीत नसणाऱ्य...