पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रानमेवा

इमेज
  आली  आली डोंगरची मैना  आंबट गोड रानमेवा  बाल गोपालांचा आनंद ठेवा नेतो आम्हां आठवणींच्या गावा . भल्या पहाटे तोडण्या रानमेवा  जाते मालन डोंगरात  पिल्लं तिची  घरात  करवंदी जाळी दाट  काढताना रानमेवा  टोचती काटे कुटे  अन  लागे चिक घट्ट तिच्या  हातास  किती ते सायास  चढे उतरे अवघड डोंगरी घाट   डोईवरी रानमेवा पाटी  तोल सांभाळत  चालत  लगबगीत   येई  ती बाजारात  पकडण्या मोक्याची जागा चौकात देई हाळी तालात  आली  आली डोंगरची मैना  आंबट गोड रानमेवा येता गिऱ्हाईक  पुढयात भरते रानमेवा  मायेनं हिरव्या द्रोणात एका वाटयास वीस करु नका घासाघीस  पहा तिची यातायात करण्या पाटी रिकामी  बसेल ती आता दिसभर उन्हात  घेऊन विकत रानमेवा   आनंदी तिला पहा  सहजची मिळती  खूप खूप दुवा .   

मदनबाण

इमेज
  मदनबाण       येता वसंत ऋतू  बहरला मदनबाण उमले सायंसमयी  वा प्रभाती पाकळ्या असती बहुल  मोहवी रूप खिळवून टाकी गंध                  होतो  धुंद बेधुंद     अशी नजरबंदी   दिपती नयन  जातो मी मोहरून एकेक पाकळी  फाकी किरण ऐसें शोभा रवीची अन  शीतलता चंद्राची            अशी   मुक्तहस्त उधळण             अदभूत किमया निसर्गाची    ... तेवढ्यात आली कुठून राणी    मी अचंबित  गळयात पडले हात देई खुडून फूल म्हणे माळ ते हलकेच केसांत  फुलून आलं प्रेम शहारे रंध्र रंध्रात  दिवसाच झाली चांद रात