पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फिरत्या चाकावरती...

इमेज
श्री शारदा माता प्रसन्न फिरत्या चाकावरती... शिवरात्र झाली थंडी संपत जाते आणि मार्च महिना उन्हाळा ऋतु बदल जाणवू लागतो . आपले पाणी पिण्याचे प्रमाण वाढू लागते. जरी फ्रिज असला तरी माठातील/ डेऱ्यातील गार पाणी पिण्याचे समाधान काही औरच. घरी नवीन माठ आणायला हवा असा सूर निघू लागला आणि संध्याकाळी मी व आमचे शेजारी बापूकाका माठ आणण्यास चालतच बाहेर पडलो. चालता चालता डेरा महात्म्य वर्णन सुरू झाले. सोलापूरकडे माठाला डेरा म्हणतात. या मातीच्या घड्याचे अनेक प्रकार आहेत-अगदी संक्रांतीची सुगडी, बोळकी ,दह्यासाठी वापरली जाणारी गाडगी, लाल अथवा काळ्या मातीचे माठ ,रांजण, कुंभ वगैरे .यात आणखीन एक प्रकार म्हणजे महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून येणारे विविध घाटाचे माठ तोटीचे चे अगर बिनतोटीचे इत्यादी. ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे तिथे माठातील पाणी हे पुरवणीस येणारे व समान गार पडत असलेने आरोग्यदृष्ट्याही हितकारक असल्याने त्याचा वापर हा होतोच. शेतावर तसेच वाड्यावस्त्यावर, गावाकडील बस थांबे रेल्वेस्टेशन्स इत्यादी ठिकाणी माठ/ लाल कापड लावलेले रांजण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची तहान भागवतात आणि अशी पाणीपुरवठा से

साजण साद

साजण साद- शब्द रचना ,चाल  आणि आवाज  नंदकिशोर लेले   झाली नजरानजर    झाली नजरानजर  सुरू झालंया नजरबंदी खेळ  लागलीया जीवा लई हुरहूर  मनात माजलंया काहूर  धडधडतय ऊर   संपता  मुक्काम लातूर  नाय खातर बारी कवा येनार परतून  सांगा राया थांबू कशी तवापतूर   रानी वारा घालोतय शीळ,  डुलू लागल्लीया शेंग तूर ,   वरती पाखरांची भिरभिर ,  कौल देतीया पापनी  सख्या सोडू नका अवसर  सांगू कशी सुटलया आता धीर  पळून जाऊ आपून दूर  दिलवरा दिलवरा कसलं करताय इचार   करु हयो दीड दमडीचा खेळ हद्दपार  आपलं सपान साकार  मांडू सुखी संसार  बिगी बिगी  चल राजा  नायतर व्हइल निसतं   कापूर धूर कापूर धूर

रोजमेळ

माझी नवीन कविता  "रोजमेळ" म्हातारपणातील आजाराने त्रस्त वयस्कर माणसं आणि त्यांची सुश्रुषा यात व्यस्त व्यक्तीच्या भावना या कवितेत मांडल्या आहेत।  " रोजमेळ"     ...  यातना, याचना आणि यातायात मेळ काही बसेना,    संसार दुर्ग पायऱ्या चढता चढता चढवेना,   देव आणि दैव यातलं अंतर मिटता मिटेना  ।।        आधीच चालली होती मोठी परीक्षा ,  त्यात करोना ची सर्वव्यापी शिक्षा,  समजवितो मना अरे तरी  नाही अग्निपरीक्षा ।    प्रखर ग्रीष्मात कोणा पायी वहाणा         तर कोणी अनवाणा ।                        परि हेच आठवून बळ किती आणू ?                 प्रभू तुझ्या दारी आलो                   होवुनी भिकारी येतं  ओठी गाणं   विनवीतसे विचारतसे   कुलदेवते  माते योगेश्वरी सत्कर्म आणि दुष्कर्म तराजू पारडं   कधी होणार समान  ?    अर्पितो तवचरणी हे काव्यपुष्प (येईल उपयोगी पासंग म्हणूनी)  हलका होतो ताण मिळतं समाधान।।