पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द मा मिरासदार श्रद्धांजली

 * ज्येष्ठ विनोदी साहित्यिक आणि कथाकथनकार श्री द मा मिरासदार हे कालच देवाघरी गेले त्यांच्यावर श्रद्धांजली वर दोन शब्द  . *..दमा  विनोदाचा निखळ झरा*           दमा म्हणजे निखळ मिश्किल विनोदाचा अखंड झरा..ग्रामीण भाषेचा योग्य वापर . ते  मूळचे पंढरपूर आमच्या सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक. दमा, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या त्रिकूटानं मराठी कथाकथन विश्वात अजोड कामगिरी केली . सर्वसामान्य माणसाला  चार घटका खळाळून हसवून निर्भेळ करमणूक करुत नवसंजीवनी दिली. त्यांचे कथाकथन गणेशउत्सवात व इतरत्र अनेक वेळा ऐकायला  मिळाले हे भाग्यच म्हणावे लागेल.कथाकथन करताना द मा उभे राहले की श्रोते तल्लीन होऊन  सकस एकपात्री अभिनय सहजसुंदर देहबोली अनुभवत  असत. "धोक्याचं वळण" " ड्रॉइंग मास्तरांचा तास" "माझी पहिली चोरी " ही कथा कथनं दमा उच्चारताच लगेचच ओठी येतात. मे  महिन्यातच"ऐसी कळवळ्याची जाती "हे श्रीयुत मिलिंद जोशी यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक मी वाचले होते . त्यात एक साहित्यिक कथाकथनकार आणि प्रेमळ हृदयाचा माणूस असे दमा यांचे व्यक्तीचित्र अतिशय उत्तम रीतीने रेखाटलं आ

पु ल- एक जिवंत अनुभव

  आज पु लंची जयंती ,विनम्र अभिवादन. पु ल- एक जिवंत अनुभव पु ल नेहमी सांगत असत सर्व प्राण्यांमध्ये माणसाला तेवढा हसता येतं आणि म्हणून प्रत्येक माणूस , त्याचा स्वभाव त्याच्या लकबी व लोकजीवन याविषयी त्यांना विलक्षण उत्सुकता असे. साहित्यातली अन संगीतातली 'अपूर्वाई 'काय असते हे त्यांनी मराठी माणसाला अतिशय सहजपणे सांगितलं. पु ल गेल्यानंतर त्यावेळी श्रद्धांजलीपरएक छोटसं काव्य सुचलं होतं ते आता जरा मुलामा देऊन (पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर थोडा नट्टापट्टा करून किंवा दिवाळी सीझन सुरू असल्याने पडताळातल्या मोठ्या पितळी भांड्यांना कलहई करून ) सादर करीत आहे. पु ल गेले...... सारा आसमंत सुनासुना झाला अवघ मराठी मन हळहळलं... हृदयी पीळ पडला ... एक बहुरुपी गेला पुलंनी आम्हाला काय नाही दिलं.. श्वास मोकळा केला हसू फुटले , घाम टिपला जीव गहिवरला अश्रू तरळले आजार पळाला नैराश्य संपलं आशा पालवली माणसामाणसातील अंतर कमी केलं दातृत्वाचा दिशा दिली... एक विनम्र श्रद्धांजली.