पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  लता- स्वरज्ञान मूर्ती आदरणीय लताजी,यांचा आज प्रथम स्मृतिदिन .  उच्चारिता नाव लता चक्षु पुढे प्रथम येते स्वरलता मागील वर्षी त्या देवाघरी गेल्यावर आणि पुढील काही दिवस सारं जनमानस खूप शोकाकूल झालं होतं. त्या काही दिवसात लतादीदींविषयी काव्य ओळी स्फुरत होत्या परंतु काव्य अपुरेच वाटत असल्याने ते ब्लॉगवर लिहिले नव्हते. म्हटलं तर ते अजूनही अपूर्णच आहे असंच ते व्यक्तिमत्त्व. तरी आज प्रथम स्मृतिदिन या निमितानं ही काव्यशब्दसुमनं त्यांच्या स्मृतीस वाहत आहे . त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा एक झरोका आहे . काही संदर्भ त्या गेलेल्या दिवसाशी आहेत हे कृपया काव्यास्वाद घेताना ध्यानी असू द्यावे ही विनंती. लता एक स्वर ज्ञानमूर्ती  गाऊ त्यांची आरती  जे नित्य देती स्फूर्ती  जरी लाभला अल्प सहवास पित्याचा दिला हाती तानपुरा, बंदीशवही आणि गळ्यात गंधार हा समृद्ध वारसा माईची साथ घेऊनी  अपार कष्ट करूनी अखंड स्वर पूजा तू बांधिलीस झालीस आधारवड सर्व कुटुंबाकरिता जन्म देऊनी थोर जाहले माता पिता स्वर संस्कार घडविले आम्हावरी जाणता अजाणता उंचावलीस ,जागवलीस उदात्त प्रखर राष्ट्रभावना जनमानसा धन