पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मन हो रामरंगि रंगले-

इमेज
मन हो रामरंगि रंगले.... रामरंगि रंगले मन आत्मरंगी रंगले मन विश्वरंगि रंगले // चरणि नेत्र गुंतले भृंग अंबुजांतले भवतरंग भंगले अंतरंग दंगले // प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या नगरीमध्ये गुढ्या तोरणे उभारून स्वागत करण्यात आले हा दिन म्हणजे गुढीपाडवा. त्या अगोदर असतो तो रंगोत्सव. काही दिवसापूर्वीच रंगोत्सवानिमित्त विविध माध्यमातून रंगाचा उल्लेख असलेली गाणी ऐकू येत होती परंतु जे गाणं कुठेही ऐकायला मिळालं नाही पण मनामध्ये सारखं रुंजी घालू लागले ते गाणं म्हणजे मन हो राम रंगी रंगले. स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांनी गायलेले हे अतिशय भावपूर्ण गाणं आहे. प्रथम मला हा अभंग आहे असं वाटत होतं. परंतु ही भक्तीरचना' आठवणीतल्या गाणी' या संकेतस्थळावर शोध घेतला असता प्रतिभावंत संगीतकार श्री गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली व स्वतः त्यांचीच ही काव्य गीत रचना हे कळलं. रंग या विविध शब्दांचा उल्लेख असलेले विविध शब्द या गीतात अतिशय समर्पकरीत्या योजिलेले आहेत. त्याने मनावर अनेक वर्ष पकड घेतलेली आहे. मात्र आज हे गीत आकळलं . या गीताचे रसग्रहण करावं असं वाटलं ते खाली देत आहे. आदरण