पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आला क्षण.... गेला क्षण...

आज सकाळी गच्चीत कपडे वाळत घालताना अंगावर येत होतं कोवळं ऊन,आनंद उल्हासीत होत होतं...  तन मन आणि क्षणात गच्चीसमोरच्या निलगिरीच्या झाडावरील अडकलेला पतंग दृष्टीस पडला .  झाले मन खिन्न आणि मग ....सुचल्या या काव्यपंक्ती.....  आला क्षण.... गेला क्षण... पतंग झेपे उंच आकाशात घेई भरारी झोकात पतंग दोरी बालकाच्या हातात खुले हास्य भारी गालात पतंग आणि बालक दोघे आता नाचू लागले तालात  डौलात क्षणात होई घात काटतो कुणी पतंग दोरी वरचेवरी आकाशात होई वाताहात मग हिरमुसे बालक होई खिन्न शोध घेई दिनभर दमून झोपे आईच्या मांडीवर पतंगही खिन्न अडकला झाडावर अंग चोरून घेई फांदीवर स्वप्न पडे बालका बोली पतंग येशील कधी करण्या माझी सुटका सुरु होण्या खेळ पुन्हा आपुल्या मनासारखा सुटला पहाट वारा लागे चाहूल तयास जाणलं  त्यानं झाले दोन सवंगडी उदास मिटवाया तगमग हालू लागे फांदी पुटपुटे पतंग स्वतःशी बरे झाले अडकलो आपण हिरव्या पानात फांदीपाशी वारा येई जोराचा, फांदी हले झुले वर-खाली नादात हलकेच सोडून देई पतंगाला त्याच्या अंगणात होता सूर्योदय बालक होई जागे पाहता अंगणात पतंग धरे त्याला हातात बिलगी आई-बाबासं आवेगात,हर्षभरात nandkisho

स्वरमयी प्रभा-

इमेज
  // श्री सरस्वती माता प्रसन्न // स्वरमयी प्रभा- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे  यांना २६ जानेवारी २०२२ च्या पूर्वसंध्येस "पद्मविभूषण " पुरस्कार जाहीर झाला. एक महान गायिका, अतिशय समर्थ शिक्षिका, संगीताच्या अभ्यासक, लेखिका व कवयित्रीही असं दिव्य प्रतिभेचं लेणं ल्यायलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विदुषी स्वरयोगिनी प्रभा अत्रे . सामान्य माणूस ज्याला शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही तो ही त्यांच्या मारुबिहाग ,कलावती व मिश्र खमाज मधील कौन गली मोरा श्याम ही ठुमरी असलेल्या प्रसिद्ध  ध्वनिमुद्रिकेतील स्वर  कानावर पडताच अंतर्मुख होतो . या ध्वनिमुद्रिकेस अमाप लोकप्रियता लाभली  आणि आजही जवळजवळ पन्नास वर्षे ती तशीच टिकून आहे.जेव्हा जेव्हा रागांवर आधारित गाण्यांचा विषय निघतो त्यावेळी कलावती आणि मारुबिहाग हे नाव निघताच डॉक्टर प्रभा  अत्रे हे नाव ओठावर लगेच येते. 'प्रथम तुझं पाहता' हे मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत अथवा' दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी' अशी गाणी ऐकली की ती कलावती या रागावर आधारित गाणी आहेत असं  शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहीत नसणाऱ्या सामान्

अक्षयदान शारदेचे...

  श्री सरस्वती देवी प्रसन्न आज वसंत पंचमी... . सरस्वती माता जन्मदिन. ३१ऑक्टोबर २००८ रोजी सुचलेली मूळकाव्य कल्पना अक्षर भेट अक्षय दान अक्षर वाटा... आज सरस्वती मातेच्या आशीर्वादाने पूर्णत्वास नेण्याचा एक प्रयत्न केला आहे. अक्षयदान शारदेचे... नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तक धारिणी  आद्य शंकराचार्य म्हणती तू काश्मीरपुर निवासिनी, ज्ञानदेव म्हणती तू अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी, नामदेव म्हणती सारजा, चतुराननाची आत्मजा, एकनाथ म्हणती सारासार विवेकमूर्ती, स्फूर्तीची स्फूर्ती ,अमूर्ताची मूर्ति तुकाराम म्हणती माउली सारजा रामदास म्हणती शारदा मूळ चत्वार वाचा, वेदमाता, शब्दमूळ वाग्देवता लेखणीतून प्रकट होई विविध रूपे लेवूनी  गद्य-पद्य -कथा, काव्य ,कादंबरी, निबंध,  लघुनिबंध  व्यक्तिचित्रण,चरित्र, ललितलेख, बखर , नाट्याविष्कार  किती सांगावी तुझीच रूपे ,,,,, प्रसन्न होता उपासकावरी नेशी अलौकिकात , भरशी मळवट   अन पाठविशी त्यासीं रसिक दरबारी    तू कुठे आहेस हे शोधणे फारच सोपे   दोन करांच्या मध्ये वसतीस  पुस्तकातूनी दाविसी विविध अक्षरवाटा  नवरसातून तुझा प्रतिभा वा