पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिमाता

  //श्री सरस्वती प्रसन्न// आदिमाता ठाई ठाई तुझे दिव्य रूप तू सृजनशक्ती , तू अखंड संजीवक, ऐश्वर्य समृद्धी वरदायिनी, तू शक्तिदायी तू बुद्धिदेवता तू प्रेरक ,तू तारक, तू दयाळू कृपाळू जनांसी आधारु तू दुर्गा तू भगवती तू योगेश्वरी चामुंडा चंडिका तू शाकंभरी तुळजाभवानी तू रेणुका सप्तशृंगी तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ,तू वैष्णव देवी, तू गावदेवी, चतुर्श्रुंगी, असशी घरोघरी तू अन्नपूर्णा अनंत अगाध रुप महिमा वर्णती सारे कवीगण संतजन परी आहेस खरोखरी तू आदिमाता जगतजननी प्रकृती व पुरुष यातील प्रकृती येता नवरात्रोत्सव हर्षती आनंदती सारे भक्तजन , होता आगमन ,सळसळे उत्साह दाही दिशातूनी मंगल वार्ता कानी पडे, विशेष संतोष पावती माता-भगिनी व्रतस्थ राहती भक्तजन ,उपासती तुज नानाविध अंगी आस तुझ्या दर्शनाची तासन तास उभे राहती रांगेतूनी अनुसरूनी कुलाचार प्रथा-परंपरा घरोघरी अन राउळी षोडपचार पूजा रूप कांती उजळती झेंडू शेवंती माला अन अखंड रात्रंदिन प्र्ज्वले समई नंदादीप सप्तशती पूजा पाठ, श्रीसूक्त, देवी,भागवत देवी स्तुती गजर तुझ्या नामाचा ओठी हर एक प्रहरी नवरात्र पुरवी ऊर्जा वर्षभरी,उजळी