पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दीपज्योती नमोस्तुते !

इमेज
  //श्री सरस्वती प्रसन्न// दीपज्योती नमोस्तुते ! आज दिव्याची अमावस्या आहे. घरोघरी दीपाचे पूजन केले जाते. ज्या दीपाने परमेश्वरास ओवाळले जाते त्याचीच आज पूजा. हाच आपल्या संस्कृतीचा महिमा आहे. प्रत्येक प्राणीमात्रातील व वस्तूतील प्राणशक्ती तत्व एकच आहे ;फक्त आविष्करण वेगळं. जे तत्त्व लहानशा पणतीच्या ज्योतीत आहे तेच तत्व विविध प्रकारच्या दिव्यांमध्ये प्रगट होतं. आधुनिक वाल्मिकी गदिमांनी त्यालाच ज्योतीने तेजाची आरती असं म्हणलं आहे. गंमत अशी की सगुणातील पूजा दृश्य स्वरूपातील आहे आणि मिळणारं समाधान मात्र अदृश्य तरी जाणवणारे आहे. गेले चार-पाच दिवस माझी ती.आई दीप पूजनाच्या तयारीत गुंग होती. तिच्यातील आर्तभाव माझ्यात परावर्तित झाला होता. पूजा उत्तम पणे पार पडली. तिला आणि मला खूप समाधान लाभलं ते तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं . यातूनच पूजा झाल्यावर खालील काव्य स्फुरले ते सादर करत आहे. दीपज्योती नमोस्तुते !   प्रार्थना                 नित्य उजळू दे अंतरीचा दीप... ओतूनीया तयात सत्कर्माचे धृत।  बळ दे दीपज्योती अडवण्या षड्ररिपुंचा वारा                 राहण्या सावध च