पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झरोका....

इमेज
परवा मला एक मित्र म्हणाला कशी असते प्रेम कविता मी त्याला म्हटलं कवितेनं माझ्यावर प्रेम केलं , फिदा आहे ती माझ्यावर माझा दिवस जातो आनंदात तरीपण तू म्हणतोच आहेस तर ऐकवतो थोडंस. शाळेत असती ती कैरीच्या फोडी सारखी , लाल हिरवी बोरांसारखी सारखी आंबट-गोड, राय आवळ्यासारखी तुरट, लाल लाल बदाम गोड झाडा वर दगड मारून पाडणारी, दप्तर पाठीवर अडकून गळ्यात गळ्यात घालून चालणारी एकमेकाची खोडी काढणारी , म्हातारीच्या झाड्वरील कणसं काढून पिसं हवेत उडवणारी, रावळगाव चॉकलेट , चिंगम चघळणारी अगदी निरागस तर दहावी अकरावीत तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यातून नजरानजर आणि जिन्यावरून जाता-येता , ट्युशनला जाताना सहवास वाढवायचा प्रयत्न करणारी थोडी भाबडीच , कॉलेजमध्ये मात्र जरा समजून उमजून वही पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी, वाढदिवस निमित काढून भेट वस्तू देत घेत, कॅन्टीन मध्ये भेटणारी ट्रीपच्या आठवणीत रमणारी.. क्याडबरी सारखी.. तर पुढे पदवीनंतर ही स्टोरी फारच क्वचित पूढे सरकते... नवीन वाटा फुटतात उच्च शिक्षण घेत असताना,सुरवातीचं अर्थार्जन करताना नदीकिनारी पाण्यात पाय टाकून बसणारं समंजस अशीही वाहत