पोस्ट्स

कवितेच्या अंगणात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

इमेज
कवितेच्या अंगणात ,गीतांच्या चांदण्यात पुष्प पहिले कवी मन हे नेहमीच जागरूक असत. सभोवताल, निसर्गातील विविध आविष्कार, ऋतुबदल ,आसपासचे सुखदुःखाचे विविध प्रसंग , हे टिपकागदाप्रमाणे त्याच्या अंतर्मनात साठत असतात हीच काव्यबीज असतात. स्वानुभव आणि परकायाप्रवेश यातून काव्य जन्म घेत. "फिरे रात्रंदिनी अवनी सुख दुःख भिडे कवी हृदयी उसंत मिळता उमटे कागदावंरी " या प्रक्रियेतून कवी व्यक्त होत राहतो. एखादी कविता किंवा गीत मला खूप आवडतं आणि ते आपल्याला का आवडते असं जर विचारलं तर त्यावेळी या कवितेमधील शब्दरचना, या कवितेमधील उपमा ,शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी, नादमयता मांडलेला विचार असा पण काहीतरी सांगतो परंतु या सर्वांचा आपण एकत्रित विचार केला तर ते झालं कवितेच रसग्रहण . कमी शब्दात जास्त आशय आणि एकाच कवितेतून एकापेक्षा जास्त अर्थ यक्त होण ही कविता या वांग्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच कवीस अभिप्रेत अर्थ आणि आपणास भावलेला अर्थ हाही वेगळा असू शकतो. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लागेल लावील वेड जीवा हे आशाताईंचं सुमधुर गीत ऐकलं ( कवी म पां भावे ) आणि अपूर...

मन हो रामरंगि रंगले...

इमेज
मन हो रामरंगि रंगले  रामरंगि रंगले मन  आत्मरंगी रंगले मन विश्वरंगि रंगले  चरणि नेत्र गुंतले  भृंग अंबुजांतले  भवतरंग भंगले    अंतरंग दंगले   प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या नगरीमध्ये गुढ्या तोरणे उभारून स्वागत करण्यात आले हा दिन म्हणजे गुढीपाडवा. त्या अगोदर असतो तो रंगोत्सव. काही दिवसापूर्वीच रंगोत्सवानिमित्त विविध माध्यमातून रंगाचा उल्लेख असलेली गाणी ऐकू येत होती परंतु जे गाणं कुठेही ऐकायला मिळालं नाही पण मनामध्ये सारखं रुंजी घालू लागले ते गाणं म्हणजे मन हो राम रंगी रंगले. स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांनी गायलेले हे अतिशय भावपूर्ण गाणं आहे. प्रथम मला हा अभंग आहे असं वाटत होतं. परंतु ही भक्तीरचना' आठवणीतल्या गाणी' या संकेतस्थळावर शोध घेतला असता प्रतिभावंत संगीतकार श्री गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली व स्वतः त्यांचीच ही काव्य गीत रचना हे कळलं. रंग या विविध शब्दांचा उल्लेख असलेले विविध शब्द या गीतात अतिशय समर्पकरीत्या योजिलेले आहेत. त्याने मनावर अनेक वर्ष पकड घेतलेली आहे. मात्र आज हे गीत आकळलं . या गीताचे रसग्रहण करावं असं वाटलं ते खाली देत...

सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण

इमेज
 सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण  जसे  फुल फुलताना दिसत नाही तसच प्रेम हे कसं फुलतं हे कळत नाही .पहिली दृष्टादुष्ष्ट- नजरा नजर हीच सुरुवात  शुभंकर  गाठ बांधते.जसे झाडांवर पहिल्यांदा कोवळी पालवी येते नंतर त्यातून फांदी दिसायला लागते त्याला पाने लागतात नंतर कळी येते फुल येते फळं येतात. प्रेमिकांच्या कधी सारख्या  गाठीभेटी होतात तर कधी क्वचित परंतु या प्रत्येक भेटीतला आनंद  प्रिया  व प्रियकर साठवत जातात. अशाच एका क्षणीक भेटीतील प्रेमभाव या गीतातून  प्रियकर व्यक्त करीत आहे. म्हणत आहे की  तुझे हास्य किती लोभस आहे सुरा अर्थात मद्य जरी जवळ असले तरी त्याला दूर करून मी तुलाच जवळ करीन .वास्तविक इथे तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध झाला असून ते सौंदर्य हसताना अधिक खुलते आणि मद्यपान केल्यावर जसा माणूस हळूहळू धुंद होतो तशी धुंदी या प्रेमिकाला चढली आहे. गीताच्या दुसऱ्या कडव्यात तुझे लोचन -नयन हे मोहक आहेत आणि तू हसताना ते अधिक मोहक दिसतात जणू चंद्राचा प्रकाश त्यात विलसत आहे असाच भास होतो. आणि त्यामुळेच चंद्रिका म्हणजेच चांदण्या ही तुझ्या नयनावर लुब्ध झालेल्य...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

इमेज
"  गीतगंगा लिहिणारे अत्रे कोठे आहेत ?त्यांना सांगा, त्यांनी हरवता कामा नये. स्थूल रूपाने ,सूक्ष्म रूपाने पण त्यांनी असायला हवे. आपल्या एकाच व्यक्तित्वात बारा अत्रे आहेत ही माहिती स्वतःअत्र्यांनी सांगितली होती त्यापैकी११ अत्र्यांना बाराव्या अत्र्यांची -केशवकुमार यांची सोबत असली पाहिजे. अत्रे कुठे कोठेही गेले,कोणत्याही स्थानी पोहचले...गीत गंगेचा कलश घेतलेल्या केशव कुमार यांची छाया त्यांच्या बरोबर आहे तोवर सारी गंमत आहे. ती हरवली मग उरले काय ? गृहकर्मी की राजकारणी, सुखशयनी बाजारी.. भ्रमणी ... हरि भजनी की भयानक रणी ही छाया गुप्तरूपाने वावरत आहे तोवर अत्र्यांचे अत्रे पण सदाविकासी राहील."  कविवर्य वसंत बापट आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस  आदरपूर्वक वंदन करून  "फत्तर आणि फुले " ही त्यांची कविता व त्याचे मला सुचलेले रसग्रहण सादर करीत आहे.आपण वाचून आनंद घ्यावा ही विनंती. फत्तर आणि फुले कविता-आचार्य अत्रे काव्यसंग्रह "निवडक केशवकुमार " होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला आनंदी फुलवेल एक जवळी ...

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी

इमेज
   वारी वारी पंढरी....कसा असतो वारकरी वार्ता आली कानी तुकोबा ज्ञानोबा दिंडी प्रस्थानाची आस लागली सर्वां विठुरायाच्या भेटीची  वारी वारी पंढरी   कसा असतो वारकरी नामघोष चाले सदा वाचे उच्चारी जय जय राम कृष्ण हरि टिळा बुक्का भाळी  तुळशी माळ  गळी  फेटा मुंडासे टोपी डोईवरी   परंपरा जपत भगिनी धरी  तुळशी वृंदावन शिरीं   पोरा बाळा सोपवून ताई माई अक्का घरी  शेजार दारी  ती  होते अन्नपूर्णा वारकरी   एकतारी टाळ मृदुंग पखवाज करि    हरि गजर नाद उमटे अंबरी अंतरी भागवत धर्म पताका खांद्यावरी  उंचावती वारंवारी   भेटता एकमेका माऊली माऊली म्हणूनी वाकुनी नमस्कार करी  तो वारकरी हाती काम मुखी नाम प्रपंच परमार्थ याची घालतो सांगड षड्रिपू वरती 'वार 'करण्या भक्तीतूनी  शक्ती मिळवितो तो 'वार'करी  करून प्रतिसाल वारी सदभावना, परोपकार ,सर्व प्राणीमात्रा प्रति प्रेम दया आदर भाव, सदैव समाधान भरून घेई ही शिदोरी   तो वारकरी संतचरित्रा ऐकून वाचून जाणी नरजन्म दुर्मिळ संसारसिंधू तरण्या नामी उपा...