पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शब्दांकुर...

// श्री शारदा देवी प्रसन्न // शब्दांकुर.. समर्थ रामदासांनी ग्रंथराज दासबोधामध्ये प्रथम दशक समास सातवा  यात कवेश्वरस्तवन लिहलं आहे. कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असं त्यांनी संबोधलं आहे . आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।  नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥ कविता अथवा काव्य कसे काय सुचते , काव्य प्रक्रिया कशी असते असे बरेच जणांना कुतूहल असते. वास्तविक कवी अथवा लेखक हा सर्वसामान्य माणसांसारखाच जगात वावरत असतो परंतु जगात चालणाऱ्या हालचाली, वस्तू यांच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी थोडी वेगळी असते. कविस व लेखक यास ही निसर्गदत्त देणगी असते . आपल्या स्वानुभवातून, अवलोकनातून, आकलनातून व परकाया प्रवेश करून त्याला सामान्य गोष्टीत ही काहीतरी वेगळं दिसतं त्याच्या हृदयी ते भिडतं  आणि ते अनावर स्फूर्तीने  कवितेतून व्यक्त होत जातं -जणू काव्य रुपी बीजांना  शब्दरूपी  अंकुर फुटतो. हेच भाव व्यक्त करणार माझं हे काव्य. शब्दांकुर  ...  नंदकिशोर लेले काव्य उमगे मनी कसे ? पृच्छा करी रसिक वदे कवी .... पाहिलं का कोणी बीज रुजताना धर

आस...

श्री शारदा देवी प्रसन्न माणसांला काही गोष्टी निसर्ग साध्य , जन्मतः  प्राप्त होतात आणि थोडे प्रयत्न करून यश लवकर मिळतं मात्र तिथंही अंगी नम्रता, लीनता असेल तरच स्थायी यश मिळत राहतं . तर काही गोष्टी उत्तम संगत , प्रबळ इच्छा शक्ती आणि अपार कष्ट यानं साध्य होतात. प्रयत्नांती परमेश्वर भेटतो,यश मिळतं. मात्र प्रयत्नांशिवाय सहज यश मिळणं हे फारच विरळ असतं आणि असं यश अस्थ्यायी असतं . म्हणून नुसती इच्छा असून चालत नाही , उद्दिष्ट प्राप्तीसाठी सतत प्रयत्न हे हवेतचं . हाच संदेश या कवितेतून प्रगट झाला आहे. आस... फुलण्या चांदणं , अवकाशी रात्र पाहिजे येण्या पौर्णिमा, वाट पाहिली पाहिजे बरसण्या पाऊस , घन ओथंबले पाहिजे येण्या पूर, नदी दुथडली  पाहिजे डवरण्या फांदी,  वाकली पाहिजे येण्या फळ , झाड मोहरलं पाहिजे येण्या रंग लाल चुटुक , मेंदी पत्थरावर घाटली पाहिजे प्रकटण्या चित्र, हाती कुंचला पाहिजे येण्या देवपण अंगी, पाषाणा घाव सोशीला पाहिजे डुंबण्या भक्तिरसात, नाम घे

मृ‍दगंध..

इमेज
उन्हाळ्यातील सुट्यांचा मौसम आता संपून लवकरच शाळा सुरू होतील. जून महिन्यातील शालेय जीवनातील आठवणींची लड उलगडणारा -मृ‍दगंध हा छोटासा लेख मृ‍दगंध. ... एक जून ची सकाळ झाली आणि खिडकीतून 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ' हा कुमार गंधर्व यांनी गायलेला तुकारामांचा अभंग कानी पडला. लगेचच मन लहानपणात गेलं. जून महिन्यातील शालेय जीवनातील आठवणींची लड मनात उलगडू लागली. उन्हाळ्यातील सुट्यांचा मौसम आता संपून लवकरच शाळा सुरू होतील. वसंतातील नव्हाळी आणि ग्रीष्मातील लाही लाही संपून वर्षा ऋतू लवकरच धरतीवर आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी हजर होईल. पहिला पाऊस हा तृषार्त धरतीवर पडतो आणि या उराउरी भेटीतून मृद्गंध आसमंती दरवळतो. जून महिना म्हणजे- शाळेतील पहिला दिवस , नवीन नवीन इयत्तेत पदार्पण, बाजारपेठेत पुस्तकं ,वह्या ,कंपास पेटी दप्तर , रंगीबिरंगी रेनकोट ,शाळेचा ड्रेस इत्यादी वस्तूंची खरेदी व ती घेण्यासाठी आई बाबा व लहानग्यांची उडणारी झुंबड, घरी आल्यावर नवीन पुस्तकांना ब्राऊन पेपर्सचे कव्हर घालणे, नवीन पुस्तकांशी पाने उलगडताना येणारा विशिष्ट वास, नवीन वर्ग भरत असलेल्या खोलीत / इमारतीत होणारा