पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निवडणुकीच्या उंबरठ्यावर....

इमेज
निवडणुकीच्या उंबरठ्यावर.... कुणी निंदा अथवा वंदा टोपी घालणं आणि बदलणं हाच आमचा धंदा घडलं काही विपरीत  की एकमेकांकडे दाखवणं बोटं हीच आमची रीत  तुम्ही बसता बोटं मोडत आम्ही असतो पत्रकारांपुढे बाता झोडत....  सेटिंग कोण कोणाचं करतं ज्याचं त्याला माहीत असतं  समजता का आम्हाला वेडे ... खुळे ... वाटतं तुम्हा चॅनलवरलं आणि पेपर मधलं सारं खरं समजून चालत असतो आम्ही ..छे छे. शाळेत शिकवलं होतं गणितामध्ये अगोदर असतो पक्ष आणि मग असतं साध्य इथे मात्र अगदी उलट राजकारणाच्या गणितात आधी असतं साध्य आणि मग असतो पक्ष आल्या निवडणुका की उत्तम प्रशासन, महिला आणि बाल कल्याण, बळीराजा आदि साऱ्या वर्गाची काळजी ज्येष्ठांसाठी सवलती आणि मोफत बरच काही असं लिहिता जाहीरनाम्यात. पाच वर्षाचा वायदा (बाजार) बहुमोल मत द्याना यंदा  करून देऊ तुमचा फायदाच फायदा ..... टोपी बदलणे हाच आमचा धंदा कायद्यातून पळवाटा काढणं हाच आमचा वायदा.  ओठावर गोड भाषा चेहऱ्यावर लावून फेशियल आणता चेरी हसू ,  कसं.... कसं.... एकदा दिलं ना मत  मग वागू पूछो मत असं  रंग बदलणारे सरडे आणि निष्ठावंत हे (नि)सरडे  निसर्गातील सरडे त्यांची भूक माफ