पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तहानलेले जीव

इमेज
तहानलेले पक्षी दिसण्या त्यांच्या अक्षी (डोळ्यात) पाणी ठेवू गच्ची गॅलरीत  होता तृष्णा शांत  पुन्हा करतील ते विहार  आनंदाने अंबरात वा वनात  पर्यावरण रक्षण बूज ठेवू सदा मनात  वृक्षारोपण करून निगराणी राखून  होऊ कृतार्थ . तहानलेले पक्षी आणि तहानलेले जीव कसा करू भेद भाव.... साऱ्या जन्माचा उन्हाळा डोईवर  अन मूल कडेवर वाडी वस्तीवर माळरानी आहे आपलीच कष्टकरी ताय माय कोस दीड कोसावरून आणते पाणी  असताना ती अनवाणी  खोल खोल गेले  डोळे  शोधून  पाणवठे तळाला गेलेल्या विहीरी आणि माणूसकीही निवडणूका आल्या की होतात चार घोषणा  कायम स्वरुपी पाणी योजना, गंगा आली अंगणी  वगैरे, वगैरे टीआरपी कव्हरेजसाठी पोहोचतात हो   टीव्हीवाले केले जातात तात्पुरते हात ओले एकीकडे उधळपट्टी, पैशाची चवड एकीकडे कायम परवड कशी घालयाची सांगड , कशी घालयाची सांगड शहरी चैन आणि गावी सतत दैना मिटण्या दृष्टी सृष्टी अंतर देईल का कोणी अनोखा आईना ?