पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्षाव

इमेज
  वर्षाव -म्हणजे मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.  पाऊस यापेक्षा अधिक काय नित्यनेमाने खाली येणारं आहे...म्हणून वर्षाव  वर्षा ऋतू प्रारंभ झाला  शब्द किती महान असतात ना ...  आजच्या वर्षां ऋतूच्या साक्षात्काराने हे प्रत्ययास आले . सारे जण गॅलरीत आले  . आ ऑ. ..व्वा.. करून बघत राहिले.. जल्लोष करत राहिले..  मनोमनी सुखावले....   प्रतिभावंत ज्येष्ठ कवी श्री भा .रा .तांबे यांची प्रसिद्ध "रुद्रास आवाहन" ही कविता आठवली (खाली दिली आहे). यामध्ये जगातील अमंगल गोष्टींचा नाश होऊन मंगलतेचा उदय होऊ दे ही मध्यवर्ती कल्पना आहे.  आणि मग हे काव्य सुचलं....  *वरुणास आवाहन*  वरूण राजा प्रार्थितो तुज अशीच धरती आकाशाची प्रीत अखंड राहू दे,   बीज रुजू दे,  उगवू दे ,  अंकुरू दे,  फुलू दे, फळू दे ,  वृक्ष वेली  डोलू दे  ओढे ,नद्या दुथडी भरून वाहू दे  सृष्टी हिरवीगार.. हिरवीगार होऊ दे  सर्व प्राणी मात्रा अन्न चारा दे  आणि  काळया आईचं धन जपणाऱ्या    बळी...

बन्सीधर

इमेज
किती मोहक लडिवाळ रूप कान्हा निळा सावळा  किती लाविसी रे लळा..... खेळ तव संचिताचा  परि आगळा कंसमामा झाला वैरी   सिद्ध तुला मारण्या  यमुना आला पूर.. तुला तारण्या  जन्म होता आरंभिल्या लिला  नवजात बाळ ते वासुदेव शिरी  पद लागता यमुना दुभंगली  म्हणून नीर ते अती पावन  भाविक ते करती प्राशन  वासुदेव देवकीस दिलेस वैराग्य  यशोदेस लाभले मातृसौभाग्य  दाविले विश्वरूप यशोदेस्  मिरवला होऊन नंदकिशोर  नवनीत चाटण्या तव ओठी  सारं गोकुळ धावे तुझ्यापाठी  सुखावती गाठी -भेटी  नवनित असे ते लौकिकी  परि होते ते अमृत अलौकिकी  सदा तव ओठी बासुरी,  म्हणूनी तू बन्सीधर   ऐकून मंजुळ ध्वनी  हर्षती धेनु डोलवती मान  गोड घंटानादानी करती नमन पुष्ट होती स्तन  मग होई क्षीर स्निग्ध मधुर  किमया तुझी अपरंपार म्हणून तू मनमोहन होता निसर्ग कोप  करांगुली वरी तोलीसी गोवर्धन   क्षणार्धी अवघे गोकुळ झालं  पुन्हा सघन सधन हरण केले महाभयंकर कालियाचे  स्वार झाला तया शिरावर केलं नर्तन श...

तुझ्या नामात रे गोडवा ......

इमेज
  सुमनताई  गळ्यात, नामात अन् रूपात रे किती गोडवा... किती गाऊ तव महिमा  भाव दाटले  साऱ्यां मराठी मनी  अश्रू अनावर नयनी  जरी असली बहुत  परि  उल्लेखितो मोजकी गाणी जागे केलेस आम्हा गाऊन जाग रे यादवा, सावळ्या विठ्ठला  केशवा माधवा  तुझ्या नामात रे गोडवा,  उठा उठा चिऊताई  गाऊन जागे केलेस चिमण्या बाळा     रिझवलेस  सान बालका अन् आईस  जोजवित अंगाई निंबोणीच्या झाडामागे बिंबविलीस माता महती गाऊन  आईसारखे  दैवत साऱ्या या जगता नाही सांगितले संसार मर्म गृहिणी कष्ट  गाऊन बहिणाबाईचे  अरे संसार संसार तवा चुल्ह्यावर   रिझवलेस तू प्रेमिका  रे क्षणांच्या संगतीने,   झिमझिम झरती श्रावणधारा   धरतीच्या कलशात, जिथे सागरा धरणी मिळते , केतकीच्या बनात नाचला ग मोर  एकदाच यावे सखया    कशी करू स्वागता म्हणूनी.... आणि  अंतर्मुख केलेस आम्हा सर्वां .....  उच्चारून समाधी घेऊन जाई ज्ञानदेव  अवीट गाणी अन् मधूर शब्द  अधिक अर्थवाही केलेस तयांना जशी माय वाढवी ...