पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थोडंसं हलकं होऊया...हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक १

नववर्षात ' हलकंफूलकं ' या सदरातून आपल्याशी संवाद साधणार आहे. लेख - थोडंसं हलकं होऊया... मार्च महिना अखेर होता मी मुंबईहून पुण्यास काही ऑफिस कामानिमित्त दुपारी निघालो होतो. बस प्रवासं खंडाळा घाटातून सुरु होता. खिडकीतून निसर्ग न्याहळत होतो , सृष्टी दिव्य रूप धारण करत होती. मनात विचार आला अशा उष्ण हवेत शुष्क झाडांना हिरवी पालवी कशी येते ? हा काय चमत्कार आहे ? विचार चक्र सुरु राहील -वसंत ऋतूचे आगमन होतं तसं पानगळ होऊन झाडांना पालवी फुटते. पानगळ म्हणजे काय तर ज्याची आवश्यकता नाही ते निसर्ग टाकून देतो व झाडे हलकी होतात पुन्हा पालवी फुटते , ताजीतवानी होतात. माझं कविमन जाग झालं- इथं हलक होणं म्हणजेच एक वेगळी आनंददायी अनुभूती घेणं - वर्षा ऋतूत जेव्हा पाऊस बरसतो त्यावेळी आकाश हलक होत असतं, खरंच किती काळ ते ढगांना धरून बसलेल असतं ना, शिल्पकार ज्यावेळी दगडातून मूर्ती घडवतो तो जडत्वाला हलकं करत असतो , वडील ज्यावेळी मुलाला खांद्यावर घेऊन ,   डोकी वर बसवून जग दाखवित असतात त्यावेळी ते स्वतः हलके होत असतात, आपली अपत्ये यशस्वी   विद्या   अभ्यास करून उत्तम अर्थार्जन करू लागतात त्यावेळ