पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाऊले चालती पंढरीची वाट...दोन अनुभव

इमेज
दोन वर्षाच्या अवकाशानंतर पंढरीची वाट आता पुन्हा वैष्णवांच्या पाऊलांनी सजलेली आहे. नुकतेच देहूतून श्री तुकोबारायांच्या आणि आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झालं आहे. एक भक्तीगंगा प्रवाह लोणंद मार्गे तर दुसरा सासवड मार्गे पंढरीच्या कळसदर्शनासाठी मार्गस्थ झाला आहे . महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या संतांच्या नावाचा दिंड्या पंढरपुरी जाण्यास निघालेल्या आहेत. सारा आसमंत विठुरायाच्या गजराने भरून गेला आहे. सारं महाराष्ट्र मानस विठ्ठलमय झालं आहे. वर्षानुवर्षे हा पालखी सोहळा सुरू आहे. अशा प्रकारचा सर्व समाज घटक समावेशक सोहळा अभावानेच इतरत्र देशी घडत असेल. भाव भोळी वारकरी मंडळी जात धर्म वंश वर्ण लिंग भेद विसरून ' राम कृष्ण हरि पांडुरंग हरि अवघी दुमदुमली पंढरी ' असा नामघोष करीत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वाटचाल करू लागली आहेत. जेथून पालखी जात आहे आणि जिथे जिथे म्हणून पालखी मुक्काम घडत आहे तेथील ग्रामस्थ मंडळी अतिशय आनंदाने त्यांचं सडा रांगोळ्या घालून स्वागत करत आहेत. खाऊ पिऊ घालत आहेत , औषध पाणी विचारत आहेत काही इतर अडचणी असल्यास त्यातही मदतीचा हात देत आहेत. सारे ग्र

सायं-शोभा

इमेज
  बँकेतील सहकारी श्री विजय देसाई उत्तम छायाचित्रकार असून गेली आठ वर्षे त्यांचे मित्र मंडळ पर्वतीवर वृक्षारोपण करून झाडांना नियमित पाणी घालते आणि वृक्षराजी फुलवण्यास हातभार लावते. असे आपले पर्यावरण प्रेमी मित्र परवा दिवशी झाडांना पाणी घालायला जात असताना त्यांनी पर्वतीवर सायं -शोभा पाहिली आणि ती कॅमेऱ्यात टिपली. छायाचित्र पाहून मला हे चित्र काव्य सुचले. सायं- शोभा १ रवि समंजस चालला आहे अस्तास सांगे नभ निळाई; आहे ग्रीष्म ऋतू शशी उदय.... सावकाश सायं -शोभा २ उषे निशेची भेट घडवी असा हा संधिकाल साक्ष देण्या आहे निल गगन विशाल.... 

प्राजक्त सडा......

इमेज
  काल  युनायटेड वेस्टर्न बॅंकेतील सहकारी व उत्कृष्ट फोटोग्राफर श्री विजय देसाई यानं सावंतवाडीला त्याच्या सासुरवाडीला गेला असता पहाटे प्राजक्त सडा टिपला कॅमेऱ्यात.... त्यावरून मला सुचलं हे चित्रकाव्य। प्राजक्त सडा...... १ झुंजू मंजू होत होतं  कोंकण देशी     मारत होतो     बागेत फेरफटका   कोकणची लाल माती बरंच काही सांगत होती  गोठयातील गाय वासरू हाबरंण, मायेने अंग चाटणं गळयातील गोड घंटा नाद  दाजी आणि ताय  काढती धारा झुरू मुरू   पितळी चरवी अन कासंडीत विहंग कूजन , राउळी भक्ती गीत सूर , सुखावून गेले कान  हलकासा पहाटवारा  करी उत्साही तन  तृण पानांवरी अवतरलं दव  हरखून गेलं मन, नूरलं भान   प्राचीवर अरुणोदय पडला सडा प्राजक्ताचा बागेत करण्या रवीचे सहर्ष स्वागत  अशी निसर्ग रंगत संगत  बसलो न्याहळत ... क्षणार्धी जुळती हात  टिपू शकलो काहीच क्षणचित्रं... सारे सारे  साठवले  मनगाभाऱ्यात... मनगाभाऱ्यात...   ######## प्राजक्त सडा...... २ पाहुनी हा प्राजक्त        झालो मी अंतरी सुस्नात  क्षणार्धी जुळती हात      विधात्यास विनम्र प्रणिपात ! $$%‰$$$$$ प्राजक्त सडा...... ३ दवात नाहली पहाट पडली अंगणी प्राजक्तफुल