प्राजक्त सडा......

 




काल  युनायटेड वेस्टर्न बॅंकेतील सहकारी व उत्कृष्ट फोटोग्राफर श्री विजय देसाई यानं सावंतवाडीला त्याच्या सासुरवाडीला गेला असता पहाटे प्राजक्त सडा टिपला कॅमेऱ्यात.... त्यावरून मला सुचलं हे चित्रकाव्य।

प्राजक्त सडा...... १

झुंजू मंजू होत होतं  कोंकण देशी   

 मारत होतो   

 बागेत फेरफटका  

कोकणची लाल माती

बरंच काही सांगत होती 


गोठयातील गाय वासरू हाबरंण, मायेने अंग चाटणं

गळयातील गोड घंटा नाद 

दाजी आणि ताय  काढती धारा झुरू मुरू 

 पितळी चरवी अन कासंडीत

विहंग कूजन ,

राउळी भक्ती गीत सूर ,

सुखावून गेले कान 

हलकासा पहाटवारा 

करी उत्साही तन

 तृण पानांवरी अवतरलं दव 

हरखून गेलं मन,

नूरलं भान 

 प्राचीवर अरुणोदय

पडला सडा प्राजक्ताचा बागेत

करण्या रवीचे सहर्ष स्वागत 


अशी निसर्ग रंगत संगत 

बसलो न्याहळत ...

क्षणार्धी जुळती हात

 टिपू शकलो काहीच क्षणचित्रं...

सारे सारे  साठवले 

मनगाभाऱ्यात...

मनगाभाऱ्यात...  

########

प्राजक्त सडा...... २

पाहुनी हा प्राजक्त 

      झालो मी अंतरी सुस्नात

 क्षणार्धी जुळती हात

     विधात्यास विनम्र प्रणिपात !

$$%‰$$$$$

प्राजक्त सडा...... ३

दवात नाहली पहाट

पडली अंगणी प्राजक्तफुलं 

फेडण्या धरती ऋण

हे अलौकिक समर्पण .


टिप्पण्या

जयंत कुलकर्णी म्हणाले…
श्री. गोंदवलेकर महाराजांचे विषयी लिहिलेले काव्य मनाला अतिशय भावले. डॉ श्रेया देशपांडे आणि श्री सुनील कुलकर्णी यांनी कथन केलेल्या महाराजांच्या कथा रुपी आठवणी मी नित्य ऐकतो. त्यामुळे आपण केलेले काव्य पुष्प आवडले. ते सर्वसमावेशक झाले आहे.
"श्री राम जय राम जय जय राम"
... जयंत शंकर कुलकर्णी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी