पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पार ....अपरंपार

इमेज
  आमुच्या अपार्टमेंट मध्ये आहे  एक पार  सर्वांनाच तो प्रिय फार  पाराच्या अवतीभवती वृक्ष  दोन-चार  ...   राम प्रहरी कानी  पडते मंजूळ पक्षीगान आणि सुरु असतो  खारुताई संचार  झाडावर सुरू असतो  तिचा खेळ सरसर चढउतार  शोधत असते खाद्य  करीत  वरच्या पट्टीत   चिव चिव फार  तिचा तो जणू गंधार....    मूर्ति लहान कार्य महान          करण्या लंका स्वारी सागरपार  बांधिण्या रामसेतू  लाविला  मौलिक  हातभार  पाहुनी हे कार्य  हर्षिला  श्रीराम हलकेच उचलून घेई निजहाती तिजला कुरुवाळी ममतेने  स्तिमित हनुमान  जणू आशीर्वाद म्हणून उमटली बोटं तिच्या तनूवरी जाहले ठळक संरक्षक कवच पट्टे  मिरवितसे अशी ओळख अपरंपार   पाराच्या आसपास  धावती भेट  मित्र मंडळींची  hi हॅलो...नेत्र पल्लवी    खुलते हास्य  होते मन प्रसन्न   विसावतो क्षणभर  पारावरी  मिटते भ्रांती खिळवून  ठेवी  हे सारं हरदिन प्रभाती     हलका होतो सर्व मनभार  होतो अंतर्मुख  मिळते नवसंजीवनी  अन इथेच फुटती काव्यप्रतिभेस आकार उकार देई आश्रय लहानथोर सर्वासी  सदा सर्वकाळ  म्हणूनी प्रिय हा पार मधुकोष वासियांचा जणू हा  जीवन आधार ..... नंदकिशोर लेले