पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी

इमेज
   वारी वारी पंढरी....कसा असतो वारकरी वार्ता आली कानी तुकोबा ज्ञानोबा दिंडी प्रस्थानाची आस लागली सर्वां विठुरायाच्या भेटीची  वारी वारी पंढरी   कसा असतो वारकरी नामघोष चाले सदा वाचे उच्चारी जय जय राम कृष्ण हरि टिळा बुक्का भाळी  तुळशी माळ  गळी  फेटा मुंडासे टोपी डोईवरी   परंपरा जपत भगिनी धरी  तुळशी वृंदावन शिरीं   पोरा बाळा सोपवून ताई माई अक्का घरी  शेजार दारी  ती  होते अन्नपूर्णा वारकरी   एकतारी टाळ मृदुंग पखवाज करि    हरि गजर नाद उमटे अंबरी अंतरी भागवत धर्म पताका खांद्यावरी  उंचावती वारंवारी   भेटता एकमेका माऊली माऊली म्हणूनी वाकुनी नमस्कार करी  तो वारकरी हाती काम मुखी नाम प्रपंच परमार्थ याची घालतो सांगड षड्रिपू वरती 'वार 'करण्या भक्तीतूनी  शक्ती मिळवितो तो 'वार'करी  करून प्रतिसाल वारी सदभावना, परोपकार ,सर्व प्राणीमात्रा प्रति प्रेम दया आदर भाव, सदैव समाधान भरून घेई ही शिदोरी   तो वारकरी संतचरित्रा ऐकून वाचून जाणी नरजन्म दुर्मिळ संसारसिंधू तरण्या नामी उपाय नामसाधना भारी  संतोषती नयन होते जरी कळस  दर्शन  पतितपावन म्हणे भेटीस येईन पुन्हा   करण्या कृतार्थ हे जीवन  मोक्षप्रा