क्षण स्वाक्षरीचा....व्यंगचित्रकार श्री मंगेश तेंडूलकर
श्रीयुत मंगेश तेंडुलकर प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.वैद्यकीय उपचारांसाठी तसेच रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. ते वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या विषयावर व्यंगचित्रे सादर करीत असत. सामान्य माणसांच्या दैनंदिन अडचणींसाठी ते प्रसंगी रस्त्यावर आंदोलन करीत असत . साल २००१ सातारा येथे युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरीत असताना तेथील स्थानिक वृत्तपत्र दैनिक ऐक्य यामध्ये त्यांची व्यंगचित्रे येत असत. व्यंगचित्रे खूपच आनंद देत असत .छोटासा प्रसंग पण त्यातील विसंगती शोधून ते व्यंगचित्र काढत असत आणि छोटासा मजकूर ही लिहिलेला असे. सातारा हे महाबळेश्वर पासून जवळ असून इथे थंडी भरपूर असते. एका थंडीमध्ये सातारा पुणे या मार्गावर शिरवळ येथे लाल परी म्हणजेच सर्वसामान्यांची एसटी पहाटेच्या वेळी चहासाठी थांबली होती. दोन माणसांमधील संवाद व्यंगचित्रांमध्ये तेंडुलकरांनी लिहिला होता आणि यथायोग्य चित्र काढले होते.... एक प्रवासी दुसऱ्या प्रवासास विचारत आहे, शिरवळ थांबा आला आहे तर उतरा चहा पिऊया.... तर त्याचा मित्र त्याला म्हणतोय 'आरं ....एवढी थंडी हाय निसतं नाव काढलं तरी घाम फुटतिय...