खारुताईचा फराळ
रामप्रहर होता खाद्य शोधण्या सफर आमची सुरू झाडावरती चाल आमुची वर खाली सरसर ....झरझर तुरुतुरु वृक्षवेलीं कोवळे कोंब, कोवळी पाने सान फळे... शोध आमचा सुरू फळा आली आमुची पुण्याई सुपर्णाताई रूप ल्यायली सीतामाई ना ठावूक आम्हां करते ती कोणती उतराई ठेवली कल्पवृक्षाखाली खास न्याहरी गोड गोड सीताफळ भारी जरी असली आमची जोडी न करतो कुरघोडी ताव मारतो आम्ही त्यावरी सर्व traffic (निसर्ग )नियम सांभाळून म्हणून आम्हा सर्व प्रक्षी प्राण्यां मिळते शांती समाधान खास पट्टे मिरवतो अंगावरी जन्म जन्मांतरी रामाचे आम्हा सदा वरदान.