पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कान्हूल्या....

इमेज
  कान्हूल्या.... सोनूल्या ...माझा कान्हूल्या नितळ कांती कुरळे कुंतल हाती मनगटी पायी वाळे कानी शुखंल कुंडल गोड गोबरे गाल परी लोभस अधिक ती जिवणी... पाय दुमडता भासशी तू देवघरीचा रांगडा कृष्णकान्हा नेत्री कोवळं कुतुहूल.... सागरतीरी न्याहळी स्व रूप जळ निर्मळ तू निर्मळ लडिवाळा ... भविष्यकाळ तुझा उज्वल

स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत

इमेज
  स्वाक्षरीचा चिरंजीव क्षण- रामदास कामत मराठी संगीत रंगभूमीवरील थोर कलाकार आणि खड्या आवाजाचे गायक श्रीयुत रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने वयाच्या नव्वदाव्या वर्षी नुकतेच निधन झाले. ही मनाला अतिशय चटका लावणारी घटना आहे. अत्यंत कष्टाळू , रंगभूमीविषयीची पराकोटीची निष्ठा , वागण्यातील प्रामाणिकपणा आणि निगर्वी प्रेमळ स्वभाव अशी गुणवैशिष्ट्ये असलेले आणि देवाघरचे ज्ञात कुणाला , गुंतता हृदय हे ,साद देती हिमशिखरे अशी एकाहून एक उत्तम नाट्यगीते, मयुरा रे फुलवित येरे पिसारा सारखी भावगीते , पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव , हे आदिमा हे अंतिमा अशी प्रार्थना गीते- भक्तीगीते आणि आणि प्रथम तुझं पाहता 'मुंबईचा जावई' हे अजरामर चित्रपट गीत गाऊन रामदास कामत यांनी मराठी रसिक मनावर अधिराज्य केले. सत्तरच्या दशकात मी शाळेत असताना पुणे आकाशवाणी केंद्रावरून सकाळी साडेआठच्या मराठी बातम्या झाल्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम लागत असे त्यामध्ये रामदास कामत यांची गाणी ऐकताना खूप आनंद मिळत असे.त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच या सर्वाचा आठव झाला आणि प्रकर्षाने आठवण झाली ती दिवाळी