पोस्ट्स

कविता चित्रकाव्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वर्षाव

इमेज
  वर्षाव -म्हणजे मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.  पाऊस यापेक्षा अधिक काय नित्यनेमाने खाली येणारं आहे...म्हणून वर्षाव  वर्षा ऋतू प्रारंभ झाला  शब्द किती महान असतात ना ...  आजच्या वर्षां ऋतूच्या साक्षात्काराने हे प्रत्ययास आले . सारे जण गॅलरीत आले  . आ ऑ. ..व्वा.. करून बघत राहिले.. जल्लोष करत राहिले..  मनोमनी सुखावले....   प्रतिभावंत ज्येष्ठ कवी श्री भा .रा .तांबे यांची प्रसिद्ध "रुद्रास आवाहन" ही कविता आठवली (खाली दिली आहे). यामध्ये जगातील अमंगल गोष्टींचा नाश होऊन मंगलतेचा उदय होऊ दे ही मध्यवर्ती कल्पना आहे.  आणि मग हे काव्य सुचलं....  *वरुणास आवाहन*  वरूण राजा प्रार्थितो तुज अशीच धरती आकाशाची प्रीत अखंड राहू दे,   बीज रुजू दे,  उगवू दे ,  अंकुरू दे,  फुलू दे, फळू दे ,  वृक्ष वेली  डोलू दे  ओढे ,नद्या दुथडी भरून वाहू दे  सृष्टी हिरवीगार.. हिरवीगार होऊ दे  सर्व प्राणी मात्रा अन्न चारा दे  आणि  काळया आईचं धन जपणाऱ्या    बळी...

डायरी...

इमेज
नववर्ष लेवुनी आले  ३६५  दिवसाची  पाने  सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेली बांधणी  माहित आहेत रंग  काही धाग्यांचे  काही मात्र गुलदस्त्यात ... संकल्पांचा बुकमार्क  प्रौढत्वी निज शैशवास जपणे, सत्पात्री यथाशक्ती दानधर्म, काय वाचा मनोभावे  सदा घडो सत्कर्म   व्यायाम अन नामस्मरण  यांसी ज्यादा गुणांक तेची आहे जीवनमर्म  राहीन सावधान घेईन रोज आढावा झोपी जाण्याआधी   मिळाले किती गुण कळण्या गुणमापनपट्टी  करि   उजळणी पानोपानी वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा  राम गावा राम ध्यावा ।  राम जीवींचा विसावा  - नंदकिशोर लेले.

ऋतसंहार

इमेज
  वरील काव्य श्री देशमाने काका यांचे मित्र प्रसिद्ध कवी श्रीयुत सदानंद डबीर यांनी रचलं आहे..  काव्य उत्तमच आहे . हे काव्य वाचून आणि चित्र बघून मला काव्य सुचले.... ऋतसंहार ११ .१०.२०२३.    तुझं नयन दल,   गालावरील खळी,  शुभ्र दंतपंक्ती,  चाफेकळी नाक लाल ओष्टकमल  आणि  मोहक केशसंभार हाच सारा ऋतुसंहार   जेंव्हा असतीस तु जवळपास  पाहून तुझी रम्य अदा ऋतू बहरतात सत्वर सदा खास कवित्व ऋतूसाठी नच अडे   नसे आमुचें प्रेम नुसते बोलघेवडे https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/6/mahakavi-kalidas.html या लेखातून उधृत.... ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्यही कालिदासाची प्रथम रचना. ‘संहार’ या शब्दाचा अर्थ येथे विध्वंस करणे किंवा नाश करणे, असा नसून संचय करणे, एकत्रित करणे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. कालिदासाने लिहिलेले ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्य म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगणार्‍या ऋतुवर्णनाचा संग्रह होय. या काव्यात सहा सर्ग आहेत. त्यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रत्येक सर्गात १६ ते २८ श्लोक असे त्याचे सुयोग्य विभाजन. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसील...

रवीअस्त.....

इमेज
 रवीअस्त मोहितो आम्हां   उठती उदगार अहा....हा  डोळ्यांचे पारणे फेडतो हरदिन हरघडी हर स्थळी रूप नित्य नूतन शशी स्वागता सहज सोडतो सिंहासन    सांगतो संपता कार्यभाग सोडा हे जग आसन सत्वर नका ही थांबू क्षणभर न धरा वृथा अभिमान केल्या कार्याचा.. याहून विरळा काय असे हा निष्काम कर्मयोग भगवद् गीतेचा  दिनभर दिले काम करा नीट     उद्याचा दिवस जाईल नीट  प्रेयसां परि श्रेयस श्रेष्ठ दावितो तो वाट नमितो नंदकिशोर रवी अस्त समयी शशी उदय होईल आता पश्चिमेवरी 

विवाह सोहळा निनाद

इमेज
माझा जिवलग मित्र विनय  वसंतगडकर याचे मुलाचा विवाह सोहळा छायाचित्र   लागताच हळदीचे रंग   पल्लवती चित्तवृत्ती  उमटती सहज मोहक भाव  मुख कमलावरती  नवपरिणीत जोडी नातं  जन्म जन्मांतरीचं म्हणून पडली गाठ   पाऊलं जपून चालून सात दृढनिश्चिय करती  खात्री विश्वास देती एकमेकां  आता जीवनभरची साथ अभंग.

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी

इमेज
   वारी वारी पंढरी....कसा असतो वारकरी वार्ता आली कानी तुकोबा ज्ञानोबा दिंडी प्रस्थानाची आस लागली सर्वां विठुरायाच्या भेटीची  वारी वारी पंढरी   कसा असतो वारकरी नामघोष चाले सदा वाचे उच्चारी जय जय राम कृष्ण हरि टिळा बुक्का भाळी  तुळशी माळ  गळी  फेटा मुंडासे टोपी डोईवरी   परंपरा जपत भगिनी धरी  तुळशी वृंदावन शिरीं   पोरा बाळा सोपवून ताई माई अक्का घरी  शेजार दारी  ती  होते अन्नपूर्णा वारकरी   एकतारी टाळ मृदुंग पखवाज करि    हरि गजर नाद उमटे अंबरी अंतरी भागवत धर्म पताका खांद्यावरी  उंचावती वारंवारी   भेटता एकमेका माऊली माऊली म्हणूनी वाकुनी नमस्कार करी  तो वारकरी हाती काम मुखी नाम प्रपंच परमार्थ याची घालतो सांगड षड्रिपू वरती 'वार 'करण्या भक्तीतूनी  शक्ती मिळवितो तो 'वार'करी  करून प्रतिसाल वारी सदभावना, परोपकार ,सर्व प्राणीमात्रा प्रति प्रेम दया आदर भाव, सदैव समाधान भरून घेई ही शिदोरी   तो वारकरी संतचरित्रा ऐकून वाचून जाणी नरजन्म दुर्मिळ संसारसिंधू तरण्या नामी उपा...

सायं-शोभा

इमेज
  बँकेतील सहकारी श्री विजय देसाई उत्तम छायाचित्रकार असून गेली आठ वर्षे त्यांचे मित्र मंडळ पर्वतीवर वृक्षारोपण करून झाडांना नियमित पाणी घालते आणि वृक्षराजी फुलवण्यास हातभार लावते. असे आपले पर्यावरण प्रेमी मित्र परवा दिवशी झाडांना पाणी घालायला जात असताना त्यांनी पर्वतीवर सायं -शोभा पाहिली आणि ती कॅमेऱ्यात टिपली. छायाचित्र पाहून मला हे चित्र काव्य सुचले. सायं- शोभा १ रवि समंजस चालला आहे अस्तास सांगे नभ निळाई; आहे ग्रीष्म ऋतू शशी उदय.... सावकाश सायं -शोभा २ उषे निशेची भेट घडवी असा हा संधिकाल साक्ष देण्या आहे निल गगन विशाल.... 

रानमेवा

इमेज
  आली  आली डोंगरची मैना  आंबट गोड रानमेवा  बाल गोपालांचा आनंद ठेवा नेतो आम्हां आठवणींच्या गावा . भल्या पहाटे तोडण्या रानमेवा  जाते मालन डोंगरात  पिल्लं तिची  घरात  करवंदी जाळी दाट  काढताना रानमेवा  टोचती काटे कुटे  अन  लागे चिक घट्ट तिच्या  हातास  किती ते सायास  चढे उतरे अवघड डोंगरी घाट   डोईवरी रानमेवा पाटी  तोल सांभाळत  चालत  लगबगीत   येई  ती बाजारात  पकडण्या मोक्याची जागा चौकात देई हाळी तालात  आली  आली डोंगरची मैना  आंबट गोड रानमेवा येता गिऱ्हाईक  पुढयात भरते रानमेवा  मायेनं हिरव्या द्रोणात एका वाटयास वीस करु नका घासाघीस  पहा तिची यातायात करण्या पाटी रिकामी  बसेल ती आता दिसभर उन्हात  घेऊन विकत रानमेवा   आनंदी तिला पहा  सहजची मिळती  खूप खूप दुवा .