रानमेवा

 




आली  आली डोंगरची मैना 

आंबट गोड रानमेवा

 बाल गोपालांचा आनंद ठेवा

नेतो आम्हां आठवणींच्या गावा .



भल्या पहाटे तोडण्या रानमेवा 

जाते मालन डोंगरात

 पिल्लं तिची  घरात 

करवंदी जाळी दाट 

काढताना रानमेवा 

टोचती काटे कुटे 

अन  लागे चिक घट्ट

तिच्या  हातास 

किती ते सायास 

चढे उतरे अवघड डोंगरी घाट 

 डोईवरी रानमेवा पाटी

 तोल सांभाळत

 चालत  लगबगीत 

 येई  ती बाजारात 

पकडण्या मोक्याची

जागा चौकात


देई हाळी तालात 

आली  आली डोंगरची मैना 

आंबट गोड रानमेवा

येता गिऱ्हाईक  पुढयात

भरते रानमेवा 

मायेनं हिरव्या द्रोणात


एका वाटयास वीस

करु नका घासाघीस 


पहा तिची यातायात

करण्या पाटी रिकामी 

बसेल ती आता दिसभर उन्हात 


घेऊन विकत रानमेवा  

आनंदी तिला पहा

 सहजची मिळती

 खूप खूप दुवा .

  

टिप्पण्या

Gurunath Deshpande म्हणाले…
बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला. सुंदर.
अनामित म्हणाले…
प्रिय Gv तू वाचून लगेचच अभिप्राय दिलास मस्तं वाटलं.
Jayant Kale म्हणाले…
खूपच छान. स्मिता पाटीलच्या जैत रे जैत सिनेमाची आठवण झाली. मस्तच.👌👌
अनामित म्हणाले…
जयंता खूप बरं वाटलं तुझा छान अभिप्राय वाचून.
S G Deshpande म्हणाले…
कविता छानच आणि फोटो अप्रतिम अगदी करवंद उचलून खावे असे वाटले
अनामित म्हणाले…
नंदू खरच आपण ह्या कष्टकऱ्यांचा किती फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. रानमेव्याच्या आठवणीने एकीकडे तोंडाला पाणी सुटले तर काट्याकुट्यांतून अत्यंत कष्टाने करवंदे बाजारात आणली गेल्यावर त्यांचा भाव पाडून कष्टकरींच्या कष्टाचे चीज न करण्याच्या आपल्या प्रवृत्तीची लाज वाटली. अत्यंत सुंदर कविता. खूप आवडली.
पराग लेले म्हणाले…
खुपच छान, रानात जाऊन खावेसे वाटते
अनिल पाठक म्हणाले…
छान, काळी काळी मैना डोंगरची मैना आपल्यापर्यंत पोचविणाऱ्या विक्रेत्यांचे त्यामागे किती कष्ट असतात याची जाणीव रसिकांपर्यंत छान पोचवली आहेस. आणि शेवटचा सल्ला- घासाघीस करू नका, उत्कृष्ट
liberty equality fraternity म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
liberty equality fraternity म्हणाले…
फार पूर्वी कोकणात जात असता अगदी रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावरील करवंदीच्या जाळीतून काढून एका आदिवासी बाईने विकली होती. त्या करवंदांच्या चवी ची आठवण झाली. आणि किती अल्पसंतुष्ट होते ते? आम्ही तिला चार पैसे जास्त दिले आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद लुटला. तो प्रसंग आठवला. छान कविता-
शशिकांत गोखले
liberty equality fraternity म्हणाले…
फार पूर्वी कोकणात जात असता अगदी रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावरील करवंदीच्या जाळीतून काढून एका आदिवासी बाईने विकली होती. त्या करवंदांच्या चवी ची आठवण झाली. आणि किती अल्पसंतुष्ट होते ते? आम्ही तिला चार पैसे जास्त दिले आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद लुटला. तो प्रसंग आठवला. छान कविता
शशिकांत गोखले
Prof. Dr. Rajshekhar Yelikar म्हणाले…
सुंदर काव्यरचना , अभिनंदन
अनामित म्हणाले…
टाळ्या मैनेची आर्थीक दैना,तिची दैनंदिनी व समाधानी वृत्ती हे नंदू तुझ्या काव्यात ओतप्रोत भरलेले आहे.मनाला चटका लावून जाते - संजय वळसंगकर .
अनामित म्हणाले…
खूपच छान,बालपण आठवलं,
काळी काळी मैना,डोंगरची मैना,नांदायला जाईना, नांदायला जाईना,
असे ओरडत आमच्या कॉलनी त फेरीवाला यायचा,
अनामित म्हणाले…
मिनल
अनामित म्हणाले…
करवंदाचे सचित्र अन् यथार्थ वर्णन केलेस . खूपच सुंदर.
संजीव चांदोरकर
अनामित म्हणाले…
संजीव तू वाचून अभिप्राय दिलास अधिक आनंद झाला, करवंद गोड गोड झाली.
अनामित म्हणाले…
आपला अभिप्राय वाचून आनंद झाला धायगुडे मॅडम
अनामित म्हणाले…
संजू तुझा आपुलकीचा अभिप्राय वाचून आनंद झाला तुझ्या कविता ही पाठवित जा.
अनामित म्हणाले…
ती भाऊआपला अभिप्राय रूपी आशीर्वाद मिळाल्यानेअधिक प्रेरणा मिळते.
अशोक आफळेO म्हणाले…
लेलेसाहेब तुमची कविता छान जमली आहे गोविंद विड्यासारखी बालपणीच्या आठवणी करवनदासारख्या गोड असतात तुमची
कविता वाचली आणि माझे बालपण
नजरेसमोर साकारले मी देखील करवनदे जांभळे आणण्यासाठी डोंगरावर जात सदर ते दिव स आठवले
तुमच्या कविते स रानमेव्याचा गंध
आहे
अशोक आफळे



अनामित म्हणाले…
आपण खूप मनस्वी अभिप्राय दिला आहे. प्रेरणादायी असते आपलं सांगण्।
वंदना माळी. म्हणाले…
खूप सुंदर काव्यरचना.टपोरी करवंदं लगेच डोळ्यासमोर उभी रहातात. कष्टकऱ्यांची व्यथा सुरेख पद्धतीने मांडली आहे.
अनामित म्हणाले…
आपण अगदी मोजक्या शब्दांत कवितेंतल मर्म सांगितलं आहे आणि त्यामुळे काव्य लिहलं ते यत्न सार्थक झाले.
अनामित म्हणाले…
thanks Anil for your valuable apperciation .
अनामित म्हणाले…
श्री कृष्णाजी खूप बरं वाटलं छान अभिप्राय वाचून.
अनामित म्हणाले…
thanks पराग
अनामित म्हणाले…
अविनाश जागिरदार -तू अगदी मस्त सविस्तर अभिप्राय दिलास.मस्त वाटलं. नंदू
अनामित म्हणाले…
आपंण त्वरीत वाचून अभिप्राय दिलात अधिक आनंद झाला.धन्यवाद
अनामित म्हणाले…
नंदू,
कविता "रानमेवा "
जपून ठेवावा असा
👌👌
अनामित म्हणाले…
धन्यवाद आपल्या अभिप्राय माझा उत्साह वाढवतो. आपलं नाव please सांगाल का।
सतीश नेरकर म्हणाले…
सुंदर .... प्रत्येकाच्या आठवणीत करवंदाला एक स्थान आहे....
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू वाचून लगेचच अभिप्राय दिलास आनंदाचा परीघ वाढला.
अनामित म्हणाले…
तू लगेचच वाचूनअभिप्राय दिलास खूप आनंद झाला.
Unknown म्हणाले…
काका,खूप छान शब्दरचना केली आहे.
"डोंगरची मैना" मनाला भावली.😊
नंदकिशोर लेले म्हणाले…
सौ सोनू तुझा अभिप्राय वाचून आनंद द्विगुणित झाला.
निखिल पवार म्हणाले…
वाचुनी तुमचा रानमेवा,
वाटे मनी हेवा,
आता जिभेला हवा,
चटकदार रानमेवा..

निखिल डी-402
Unknown म्हणाले…
काय सांगू लेले साहेब,आपण मला गावाची आठवण करून दिली
मी भल्या पहाटे करवंदे तोडण्यास जात असे, करवंद तोडल्यानंतर डोंगरातील टेम्भुर्णीच्या पानांचा द्रोण बनवून त्यामध्ये ठेवत असे
माझ्या बहीनीचे नाव मालन हा योगायोग,नुकतीच ४ महिन्या पूर्वी ती देवाघरी गेली....तरी आपण उत्तम कवी आहात हे कोणीही नाकारू शकत नाही...
अभिनंदन





Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रिय निखिल तुझा प्रेमळ अभिप्राय वाचून खूप समाधान वाटलं. तु एक अभिप्राय काव्यओळीतून दिला आहेस .तुझं वाचन अवलोकन उत्तम आहे याचं प्रत्यंतर येतं.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी