पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आकाश पांघरुनी.....हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २

हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २ आकाश पांघरुनी..... १९९७-९८ साल असावे नोकरीनिमित्त मी साताऱ्याला होतो ; दैनिक ऐक्य मध्ये रमेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे येत असत. थंडी सुरू झाली आणि तीचा जोर वाढत चालला की मला नेहमी मंगेश तेंडुलकर यांच्या एका व्यंगचित्राची आठवण होते. व्यंगचित्रात वर्णन केलेला प्रसंग असा आहे -'मुंबई महाबळेश्वर लाल एसटी बस शिरवळ थांब्यावर थांबली आहे आणि दोघं प्रवासी महाबळेश्वरला थंडी कशी आहे याची चर्चा करत आहेत आणि त्याला एका प्रवाशांकडून उत्तर मिळतं- 'काय ईचारू नका निस्त नाव काढलं तरी घाम फुटतुया !' थंडी आणि पांघरूण यांचं अतूट नातं आहे. तसं पाहिलं तर पांघरूण तर आपण दररोज वापरतोच परंतु इतर ऋतू पेक्षा हिवाळ्यात त्याची संरक्षणासाठी जास्त गरज असते जेणेकरून उब निर्माण झाल्याने झोप शांत लागते. पांघरूण प्रकारही विविध आढळतात जसे सोलापुरी चादर, पंढरपुरी घोंगडी .कांबळ, कापसाच्या जयपुरी दुलया, दोहर,जुन्या कापडांच्या वाकळ ,गोधड्या, वुलनच्या शाली ,ब्लांकेट्स इत्यादी. हवामानाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि व्यक्तीची प्रकृती यानुसार याचा वापर होत असतो. हा