पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोवळं ऊन

सांगली कोल्हापूर मधील पुराचा हाहाःकार  आणि सामान्य जनतेचे हाल पाहून मनी उठलेले भाव .... Head and the Heart कोवळं ऊन  पाऊस कधीचा पडतो केव्हा विश्राम घेणार हा दिसणार ,मिळणार कधी ते कोवळं उन ? तिकडं सांगली,कोल्हापूर, कर्नाटक,ओरिसा .... डोळ्यात पाणी आणणारी आणि आटवणारी अतिवृष्टी ,पुराचा हाहाःकार  आणि इकडं एवढयाशा  कोवळ्या ऊनासाठी आसुसलेला मी ... सुखवस्तू सुंदर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मला हवं आहे अंगावर घेण्यासाठी  कोवळं ऊन  चोहोकडून फाटलेले आभाळ आणि विना छप्पर ती जनता कशी सांगड घालायची ? सांगा.. कशी सांगड घालायची? सुखलोलुपता आणि पूर्ण भिजलेल्या ,करपलेल्या भाकरीची, वैरण  विना दैना झालेल्या त्या मुक गुराढोरांची अन  पक्षी पाखरांची..  सारंच  ऋतुचक्र बदलतं  आहे झपाट्याने माल्थस चा सिद्धांत खरा ठरत आहे केव्हा कळणार मला कोवळं ऊन अंगावर नाही तर अंतरंगात पडायला हवं मडयावरच्या  लोणी खाणाऱ्या राजकारणा कडे दुर्लक्ष करायला हवं... Sympathy आणि Empathy मधील अंतर मिटायला हवं कोवळं ऊन  अंतरात पडायला हवं .. तळटीप : An

वाढदिवस

//श्री सरस्वती देवी प्रसन्न// वाढदिवस आज वाढदिवस दावती खुणावती गतवर्षे  येतो भारी आठव बाबांचा अन बाळकृष्ण तसबिरीचा काय साठवलं आणि निसटलं.... मम ओंजळीत चाळतो खतावणी करण्या उजळणी सत्कृत्याची  अन मांडणी , जुळणी नवसंकल्पांची  साठ पूर्ण एकषष्ठ  पदार्पण लाभले उत्तम आरोग्य वारसा मातृ-पितृ कुलाचा मी भाग्यवान मातृ-पितृ बंधू मित्र स्नेहजन प्रेम मिळाले उदंड ! अखंड उजळू दे अंतरी प्रकाश मांगल्याचा ,सहृदय ते चा , सौजन्य तेचा दूर लोटू दे काजळी अमंगलतेची आलो मानव जन्मा  जाणून घेऊ दे मर्म या जन्माच्या कार्य -कारणाचे सदा राहू दे मातृ छायेत , फिरू दे हात मायेचा पाठीवर ज्येष्ठांचा, मित्र परिवार अन आप्त स्नेहीजनांचा सुमार्ग पथी अग्रेसर होण्यास्तव ..... अखंड घडू दे साहित्यसेवा होण्या मन उन्नयन  अर्पितो काव्य सुमन नमितो नंदकिशोर शारदे तव कमलचरणांशी... 

श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत-

श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत- आज ३१ जुलै २०१९ कॉलेजच्या सन 1975 पहिल्या दिवसापासूनचा असलेला माझा वर्गमित्र गुरु आणि बँकेतील अत्यंत यशस्वी कारकीर्द असलेला अधिकारी श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत आहे. त्यांच्या Send Off कार्यक्रमास उपस्थित राहण्याची माझी खूप इच्छा होती तू परंतु ते शक्य होत नसल्याने माझ्या भावना या पत्रातून मी व्यक्त करत आहे. गुरु हे व्यक्तिमत्व आणि त्यांची बँकेतील कारकीर्द याविषयी आज सांगितलं जाईलच. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले गुरु हा माझा कॉलेज मधील वर्गमित्र आहे. त्याच्या व माझ्या पहिल्या भेटीची आठवण अशी आहे. दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश करताना गुलबर्गा इथून आलेला पायजमा शर्ट आणि रबरी चप्पल व हसतमुख चेहरा अशा वेषात त्याची व माझी ओळख कॉलेजच्या काउंटरवर कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात प्रवेश घेताना फी भरताना झाली व त्यानंतर कॉलेज मध्ये वर्गात एकत्र बाकावर, समाज कल्याण केंद्र सोलापूर येथे त्यावेळच्या शिवाजी युनिव्हर्सिटी लायब्ररीत शेजारी शेजारी असा अभ्यास करत