कोवळं ऊन

सांगली कोल्हापूर मधील पुराचा हाहाःकार  आणि सामान्य जनतेचे हाल पाहून मनी उठलेले भाव ....
Head and the Heart

कोवळं ऊन 
पाऊस कधीचा पडतो
केव्हा विश्राम घेणार हा
दिसणार ,मिळणार कधी ते कोवळं उन ?
तिकडं सांगली,कोल्हापूर, कर्नाटक,ओरिसा .... डोळ्यात पाणी आणणारी आणि आटवणारी अतिवृष्टी ,पुराचा हाहाःकार 
आणि इकडं एवढयाशा  कोवळ्या ऊनासाठी आसुसलेला मी ... सुखवस्तू
सुंदर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मला हवं आहे अंगावर घेण्यासाठी कोवळं ऊन 
चोहोकडून फाटलेले आभाळ आणि विना छप्पर ती जनता
कशी सांगड घालायची ? सांगा.. कशी सांगड घालायची?
सुखलोलुपता आणि पूर्ण भिजलेल्या ,करपलेल्या भाकरीची, वैरण  विना दैना झालेल्या त्या मुक गुराढोरांची अन  पक्षी पाखरांची..
 सारंच  ऋतुचक्र बदलतं  आहे झपाट्याने
माल्थस चा सिद्धांत खरा ठरत आहे
केव्हा कळणार मला
कोवळं ऊन अंगावर नाही तर अंतरंगात पडायला हवं
मडयावरच्या  लोणी खाणाऱ्या राजकारणा कडे दुर्लक्ष करायला हवं...
Sympathy आणि Empathy मधील अंतर मिटायला हवं
कोवळं ऊन  अंतरात पडायला हवं ..

तळटीप :
An easy way to stop the confusion between sympathy and empathy is to remember this: sympathy is a feeling you share with another person; empathy is the ability to understand the emotions of another person. To put it another way, it's a difference between the head (empathy) and the heart (sympathy).
  • Since I became a mother, I have developed a great deal of empathy for those who have lost children.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी