पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

इमेज
"  गीतगंगा लिहिणारे अत्रे कोठे आहेत ?त्यांना सांगा, त्यांनी हरवता कामा नये. स्थूल रूपाने ,सूक्ष्म रूपाने पण त्यांनी असायला हवे. आपल्या एकाच व्यक्तित्वात बारा अत्रे आहेत ही माहिती स्वतःअत्र्यांनी सांगितली होती त्यापैकी११ अत्र्यांना बाराव्या अत्र्यांची -केशवकुमार यांची सोबत असली पाहिजे. अत्रे कुठे कोठेही गेले,कोणत्याही स्थानी पोहचले...गीत गंगेचा कलश घेतलेल्या केशव कुमार यांची छाया त्यांच्या बरोबर आहे तोवर सारी गंमत आहे. ती हरवली मग उरले काय ? गृहकर्मी की राजकारणी, सुखशयनी बाजारी.. भ्रमणी ... हरि भजनी की भयानक रणी ही छाया गुप्तरूपाने वावरत आहे तोवर अत्र्यांचे अत्रे पण सदाविकासी राहील."  कविवर्य वसंत बापट आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस  आदरपूर्वक वंदन करून  "फत्तर आणि फुले " ही त्यांची कविता व त्याचे मला सुचलेले रसग्रहण सादर करीत आहे.आपण वाचून आनंद घ्यावा ही विनंती. फत्तर आणि फुले कविता-आचार्य अत्रे काव्यसंग्रह "निवडक केशवकुमार " होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला आनंदी फुलवेल एक जवळी