वाढदिवस

//श्री सरस्वती देवी प्रसन्न//
वाढदिवस

आज वाढदिवस
दावती खुणावती गतवर्षे 
येतो भारी आठव बाबांचा अन बाळकृष्ण तसबिरीचा
काय साठवलं आणि निसटलं.... मम ओंजळीत
चाळतो खतावणी करण्या उजळणी सत्कृत्याची  अन मांडणी , जुळणी नवसंकल्पांची 
साठ पूर्ण एकषष्ठ  पदार्पण
लाभले उत्तम आरोग्य
वारसा मातृ-पितृ कुलाचा
मी भाग्यवान मातृ-पितृ बंधू मित्र स्नेहजन प्रेम मिळाले उदंड !
अखंड उजळू दे अंतरी प्रकाश मांगल्याचा ,सहृदयतेचा , सौजन्यतेचा
दूर लोटू दे काजळी अमंगलतेची
आलो मानव जन्मा  जाणून घेऊ दे मर्म
या जन्माच्या कार्य -कारणाचे
सदा राहू दे मातृ छायेत , फिरू दे हात मायेचा पाठीवर ज्येष्ठांचा, मित्र परिवार अन आप्त स्नेहीजनांचा
सुमार्ग पथी अग्रेसर होण्यास्तव .....
अखंड घडू दे साहित्यसेवा
होण्या मन उन्नयन
अर्पितो काव्य सुमन
नमितो नंदकिशोर
शारदे तव कमलचरणांशी... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण