श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत-

श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत-

आज ३१ जुलै २०१९ कॉलेजच्या सन 1975 पहिल्या दिवसापासूनचा असलेला माझा वर्गमित्र गुरु आणि बँकेतील अत्यंत यशस्वी कारकीर्द असलेला अधिकारी श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत आहे. त्यांच्या Send Off कार्यक्रमास उपस्थित राहण्याची माझी खूप इच्छा होती तू परंतु ते शक्य होत नसल्याने माझ्या भावना या पत्रातून मी व्यक्त करत आहे.

गुरु हे व्यक्तिमत्व आणि त्यांची बँकेतील कारकीर्द याविषयी आज सांगितलं जाईलच. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले गुरु हा माझा कॉलेज मधील वर्गमित्र आहे. त्याच्या व माझ्या पहिल्या भेटीची आठवण अशी आहे. दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश करताना गुलबर्गा इथून आलेला पायजमा शर्ट आणि रबरी चप्पल व हसतमुख चेहरा अशा वेषात त्याची व माझी ओळख कॉलेजच्या काउंटरवर कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात प्रवेश घेताना फी भरताना झाली व त्यानंतर कॉलेज मध्ये वर्गात एकत्र बाकावर, समाज कल्याण केंद्र सोलापूर येथे त्यावेळच्या शिवाजी युनिव्हर्सिटी लायब्ररीत शेजारी शेजारी असा अभ्यास करत आणि नंतर नोकरीनिमित्त एकाच बँकेत त्यावेळी युनायटेड वेस्टर्न बँक आणि आताची आयडीबीआय बँक असा हा मैत्रीचा प्रवास आहे. रविवारी लायब्ररी बंद असल्याने आम्ही समाज कल्याणच्या बागेतच सकाळी अभ्यासाला येत असू .विशेष सांगायचे म्हणजे हा पठ्या असा एकही दिवस असा गेला नाही की तो माझ्या अगोदर कितीतरी वेळ येऊन अगोदर अभ्यास बसलेला दिसला नाही. माझ्या कडे सायकल होती आणि घर लायब्ररीच्या अगदी जवळ होते परंतु गुरूला गावातून दोनेक किलोमीटर अंतर चालून यायला लागायचे . हा माणूस सकाळी 7 ते 11 या काळात कॉलेज ते घर ,घर ते कॉलेज ,दुपारी 1 ते 5 मध्ये घर ते लायब्ररी व नंतर लायब्ररी ते घर आणि संध्याकाळी परत घर ते लायब्ररी आणि लायब्ररी ते घर असा चालत सर्वकडे जा- ये करत असे . 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असेच म्हणावे लागेल. खरंच गुरु म्हणजे अत्यंत सालस , निगर्वी, सर्वांना हर प्रसंगी सर्वतोपरी मदत करणारा आणि बँकेत अतिशय कष्टाळू प्रामाणिक वक्तशीर , जिथे आपण काम करतो संस्थेच्या हितासाठी व उत्कर्षासाठी तन आणि मन अर्पण केलेला Seasoned banker आहे. बँकेमध्ये ज्या ठिकाणी शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो अशा लोणंद, फलटण , तिर्‍हे पंढरपूर आणि सोलापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केले असून प्रत्येक ठिकाणी बँक नावारूपाला आणली आहे. पंढरपूर येथील कारकिर्दीत त्यांना बेस्ट ब्रांच मॅनेजर हा अत्यंत गौरवाचा विशेष सन्मान आयडीबीआय बँकेने बहाल केला होता तसेच आणखीनही गौरव त्यांच्या खात्यात जमा आहेत ही सर्व त्यांच्या कार्यकर्तृत्वाची Acknowledgement पोच-पावती आहे. बँकेत काम करत असताना त्यांनी व्यक्तिगत जीवनात कितीही अडचणी व समस्या असल्या तरी त्या पूर्ण बाजूला ठेवून अत्यंत चांगलं काम केलं आहे हे सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे विशेषतः गुरु राज यांच्या पत्नीचे अतुल्य असे योगदान असल्यानेच शक्य झालं आहे. त्यामुळे आज त्यांच्याविषयीही मी आदर भावना व्यक्त करतो. गुरूच्या आयुष्याकडे पाहताना मला दोन गोष्टी स्पष्ट जाणवतात आणि संत विचारांचा आधार घेतचं ते सांगावं लागेल-व्यक्तिगत आयुष्यात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान आणि बँकेत यत्न तोचि देव जाणावा आणि समर्थांच्या पावन भिक्षेत सांगितल्याप्रमाणे 'सावधपण मज दे रे राम "बहुजन मैत्री दे रे राम " या वचनांचा अंगीकार केल्यामुळेच त्यांना कौटुंबिक सौख्य व व्यवसायिक यश लाभले आहे.

गुरु बँकेत दावणीला आणि वहिनी घरात दावणीला ही परिस्थिती आता गुरु रिटायर होत असल्याने बदलेल व तो त्यांच्या कुटुंबियांना अधिक वेळ निश्चितपणे देईल. चिरंजीव निखिल याला बाबांचा सहवास आता अधिक लाभणार आहे.त्यांच्या कन्येचा जी आता ॲडव्होकेट आहे अशी तेजू हिचा विवाह लवकर ठरो ही भावना व्यक्त करतो व गुरुस आणि त्यांच्या कुटुंबियांस उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो अशी आमचे ग्रामदैवत सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. आमच्या मैत्रीचे बंध गुरु रिटायर होत असल्याने आता वरचेवर गाठ पडून अधिकच बळकट होतील ही भावना व्यक्त करून माझे मनोगत संपवतो.

‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी