वर्षाव

 

वर्षाव -म्हणजे मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया. 

पाऊस यापेक्षा अधिक काय नित्यनेमाने खाली येणारं आहे...म्हणून वर्षाव

 वर्षा ऋतू प्रारंभ झाला 

शब्द किती महान असतात ना ...

 आजच्या वर्षां ऋतूच्या साक्षात्काराने हे प्रत्ययास आले .

सारे जण गॅलरीत आले  . आ ऑ. ..व्वा.. करून

बघत राहिले..

जल्लोष करत राहिले.. 

मनोमनी सुखावले.... 

 प्रतिभावंत ज्येष्ठ कवी श्री भा .रा .तांबे यांची प्रसिद्ध "रुद्रास आवाहन" ही कविता आठवली (खाली दिली आहे). यामध्ये जगातील अमंगल गोष्टींचा नाश होऊन मंगलतेचा उदय होऊ दे ही मध्यवर्ती कल्पना आहे. 

आणि मग हे काव्य सुचलं....


 *वरुणास आवाहन* 

वरूण राजा प्रार्थितो तुज

अशीच धरती आकाशाची प्रीत अखंड राहू दे,  

बीज रुजू दे, 

उगवू दे , 

अंकुरू दे, 

फुलू दे, फळू दे , 

वृक्ष वेली 

डोलू दे 

ओढे ,नद्या दुथडी भरून वाहू दे 

सृष्टी हिरवीगार.. हिरवीगार होऊ दे 

सर्व प्राणी मात्रा अन्न चारा दे 

आणि 

काळया आईचं धन जपणाऱ्या   

बळीराजाच्या कष्टाला मोल दे

सारी भारतभू सुजलाम् सुफलाम होऊ दे...

विठुरायाच्या भेटीला आसवलेल्या 

अमुच्या वारकरी रायाची पताका उंच उंच जाऊ दे 


आणि निर्ढावलेल्या माणसाला 

 थोडीतरी माणुसकी दे 

 जगण्याचं आणि जगवण्याचे भान दे 



https://photos.app.goo.gl/JZ31S8KgemzvjJBx7
Video 




https://drive.google.com/file/d/16Pv3cwO4TwxMlKEZ3tKLbZfm3mwbj4-V/view?usp=drivesdk



टिप्पण्या

गुरुनाथ देशपांडे GV kolhapur म्हणाले…
उस्फूर्त, प्रसंगोचित काव्य.
एकदम सुंदर.
निनावी म्हणाले…
खूप छान चिंब करणारी कविता!
Jayant Kale म्हणाले…
एकदम मस्त. भा रा तांबे यांची कविता खूप दिवसांनी वाचली. सुंदर 👌
विजय रणसिंग म्हणाले…
नंदकुमार जीं खूप छान लिखाण... 🙏

सहज सुचलंय

ऋतूंच्या चौकटीत नकोच अडकायला,
पावसानेही कधीतरी मनसोक्त कोसळावे...
थेंबानेही बंधनांचे पाश तोडून,
फक्त आणि फक्त प्रेमाचे अमृत व्हावे!
आता कुठे थांबू नये
आता कुठे थांबू नये...
श्रीकृष्ण देशपांडे मधुकोश म्हणाले…
वा वा नंदकिशोर जी, खूपच छान काव्य रचले आणि वेळ अगदी योग्य साधली. तुमच्याकडे शब्दांची खाण आहे, त्यातून एक एक शब्द मोती वेचून तुम्ही काव्यहार तयार करता. सृष्टीची सर्व रूप त्याचबरोबर वारकरी विठुरायाचे नाते आणि शेवटी माणुसकीचे भान मागणे. खूप छान.👌🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अगदी खरं आहे..दाद द्यावी ती अशी.
आपण सर्वांवर मनापासून प्रेम करता साहित्याचा आनंद घेता,स्नेह जपता आनंद होतो.. धन्यवाद. .
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
धन्यवाद आपले नाव कळले नाही कृपया सांगाल का.
Mahesh Lele म्हणाले…
खूप छान काव्य व वर्षा ऋतु बाबत लिखाण ....
निनावी म्हणाले…
खूप छान 👍
लिहित रहा. कविता करीत रहा.
भा.रा. तांबे यांची कविता खूप दिवसांनी वाचली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

तुझ्या नामात रे गोडवा ......