वर्षाव

 


वर्षाव -म्हणजे मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया. 

पाऊस यापेक्षा अधिक काय नित्यनेमाने खाली येणारं आहे...म्हणून वर्षाव

 वर्षा ऋतू प्रारंभ झाला 

शब्द किती महान असतात ना ...

 आजच्या वर्षां ऋतूच्या साक्षात्काराने हे प्रत्ययास आले .

सारे जण गॅलरीत आले  . आ ऑ. ..व्वा.. करून

बघत राहिले..

जल्लोष करत राहिले.. 

मनोमनी सुखावले.... 

 प्रतिभावंत ज्येष्ठ कवी श्री भा .रा .तांबे यांची प्रसिद्ध "रुद्रास आवाहन" ही कविता आठवली. यामध्ये जगातील अमंगल गोष्टींचा नाश होऊन मंगलतेचा उदय होऊ दे ही मध्यवर्ती कल्पना आहे. 

आणि मग हे काव्य सुचलं....


 *वरुणास आवाहन* 

वरूण राजा प्रार्थितो तुज

अशीच धरती आकाशाची प्रीत अखंड राहू दे,  

बीज रुजू दे, 

उगवू दे , 

अंकुरू दे, 

फुलू दे, फळू दे , 

वृक्ष वेली 

डोलू दे 

ओढे ,नद्या दुथडी भरून वाहू दे 

सृष्टी हिरवीगार.. हिरवीगार होऊ दे 

सर्व प्राणी मात्रा अन्न चारा दे 

आणि 

काळया आईचं धन जपणाऱ्या   

बळीराजाच्या कष्टाला मोल दे

सारी भारतभू सुजलाम् सुफलाम होऊ दे...

विठुरायाच्या भेटीला आसवलेल्या 

अमुच्या वारकरी रायाची पताका उंच उंच जाऊ दे 


आणि निर्ढावलेल्या माणसाला 

 थोडीतरी माणुसकी दे 

 जगण्याचं आणि जगवण्याचे भान दे 



टिप्पण्या

गुरुनाथ देशपांडे GV kolhapur म्हणाले…
उस्फूर्त, प्रसंगोचित काव्य.
एकदम सुंदर.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

तुझ्या नामात रे गोडवा ......

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण