रवीअस्त.....


 रवीअस्त मोहितो आम्हां 

 उठती उदगार अहा....हा 

डोळ्यांचे पारणे फेडतो

हरदिन हरघडी हर स्थळी

रूप नित्य नूतन

शशी स्वागता सहज सोडतो सिंहासन
 
 सांगतो संपता कार्यभाग

सोडा हे जग आसन सत्वर

नका ही थांबू क्षणभर

न धरा वृथा अभिमान केल्या कार्याचा..
याहून विरळा काय असे हा निष्काम कर्मयोग भगवद् गीतेचा 

दिनभर दिले काम करा नीट     उद्याचा दिवस जाईल नीट
 प्रेयसां परि श्रेयस श्रेष्ठ दावितो तो वाट

नमितो नंदकिशोर रवी अस्त समयी
शशी उदय होईल आता पश्चिमेवरी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण