दवबिंदू......


 

दवबिंदू निसर्ग अविष्कार सौंदर्य

 व्हिडिओत लोभस टिपलं आहे ..

ज्येष्ठ बंधू श्रीकांत यानं (now on USA tour) मी मोहून गेलो....

काव्य सुचेल असे वाटू लागले 

मग पहाटे ते अवतरले ते काव्य

 

 दवबिंदू...


 सोनेरी पिवळे, तांबूस तुरे तोलून धरती दवबिंदूस

दवबिंदू म्हणती तुऱ्यास 

अणकुचीदार तरी सहन करता भार 


तुरे म्हणती कसला भार 

आम्ही नार... तू सरदार!


खुलवीसी सौंदर्य अमुचे 

म्हणूनी  वाट पहातो 

तुला झेलण्या तासन् तास..

असे मैत्र फुले डोले 

दिलखुलास..

 

तोशीस घेऊन स्नेह जपणे 

शिकवी निसर्ग आम्हांस


असे संवाद पडण्या कानी 

 जावे नित्य पहाटे फिरण्यास

 डोळ्यांचे कान करून

करावे थोडं बोलके मौनास...

              करावे थोडं बोलके मौनास......


टिप्पण्या

निनावी म्हणाले…
नंदू, विषय साधा आशय मोठा अशी ही तुझी कविता नेहमीप्रमाणे सुंदर आहे,त्या दवबिंदुंसारखी .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

बिंब प्रतिबिंब.....