पार ....अपरंपार

 


आमुच्या अपार्टमेंट मध्ये आहे
 एक पार
 सर्वांनाच तो प्रिय फार 
पाराच्या अवतीभवती वृक्ष
 दोन-चार  ... 


 राम प्रहरी कानी  पडते मंजूळ पक्षीगान आणि सुरु असतो
 खारुताई संचार
 झाडावर सुरू असतो
 तिचा खेळ सरसर चढउतार

 शोधत असते खाद्य 
करीत  वरच्या पट्टीत  
चिव चिव फार
 तिचा तो जणू गंधार.... 

 
मूर्ति लहान कार्य महान          करण्या लंका स्वारी सागरपार
 बांधिण्या रामसेतू 
लाविला  मौलिक  हातभार 

पाहुनी हे कार्य 
हर्षिला  श्रीराम
हलकेच उचलून घेई निजहाती तिजला कुरुवाळी ममतेने
 स्तिमित हनुमान

 जणू आशीर्वाद म्हणून उमटली बोटं तिच्या तनूवरी
जाहले ठळक संरक्षक कवच पट्टे 
मिरवितसे अशी ओळख अपरंपार  


पाराच्या आसपास 
धावती भेट  मित्र मंडळींची
 hi हॅलो...नेत्र पल्लवी 
  खुलते हास्य
 होते मन प्रसन्न
  विसावतो क्षणभर  पारावरी
 मिटते भ्रांती
खिळवून  ठेवी 
हे सारं हरदिन प्रभाती
   

हलका होतो सर्व मनभार
 होतो अंतर्मुख
 मिळते नवसंजीवनी 
अन इथेच फुटती काव्यप्रतिभेस आकार उकार

देई आश्रय लहानथोर सर्वासी 
सदा सर्वकाळ 
म्हणूनी प्रिय हा पार
मधुकोष वासियांचा जणू हा
 जीवन आधार .....


नंदकिशोर लेले



टिप्पण्या

Manjiri Deshpande म्हणाले…
खूप सुंदर कविता👌पार संस्कृतीची परत आठवण झाली आठवण झाली
जयंत कुलकर्णी म्हणाले…
अतिशय सुंदर रचना. खूप आवडली. मधूकोष मधील पाराचे यथार्थ वर्णन.
Mahesh Lele म्हणाले…
खूपच छान.. डोळ्यासमोर मधुकोष परिसर दृश्य उभे केले
Unknown म्हणाले…
नंदू, कविता अतिशय छान जमली आहे .
पूर्वीच्या काळी गावातल्या पारावर संपूर्ण गावचे राजकारण चालायचे.
मदन करजगी म्हणाले…
खूप छान कविता. आपुला मधुकोष मधे एक सुंदर असा पारा जिथे सुचते सुंदर कविता आणि होतात गाठीभेटी. फोटो पण मस्त. अभिनंदन. 👌👌
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
रसिक गायक वादक मदनजी, आपल्या छान अभिप्राय यामुळे नवीन ऊर्जा मिळाली.
liberty equality fraternity म्हणाले…
खूप सुंदर!
--शशिकांत गोखले
Unknown म्हणाले…
खूपच छान कविता !!!
Unknown म्हणाले…
खूपचं छान.!👍👌
Unknown म्हणाले…
पार आणि खारूताईचे सुंदर वर्णन कवितेत केले आहे.बाकीच्या ओळींमधूनही पार प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभा राहिला.एकूणच पार मनाला खूप भावला.👍🏻🙏🏻
Unknown म्हणाले…
एकदम मस्त. झकास कल्पना आणि कविता आहे.. खरंच सुंदर लिहिली आहे. आवडली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी