तहानलेले जीव












तहानलेले पक्षी
दिसण्या त्यांच्या अक्षी (डोळ्यात)
पाणी ठेवू गच्ची गॅलरीत 

होता तृष्णा शांत 
पुन्हा करतील ते विहार 
आनंदाने अंबरात वा वनात 

पर्यावरण रक्षण बूज ठेवू सदा मनात 
वृक्षारोपण करून निगराणी राखून 
होऊ कृतार्थ .

तहानलेले पक्षी आणि तहानलेले जीव
कसा करू भेद भाव....

साऱ्या जन्माचा उन्हाळा डोईवर 
अन मूल कडेवर
वाडी वस्तीवर माळरानी आहे
आपलीच कष्टकरी ताय माय
कोस दीड कोसावरून आणते पाणी 
असताना ती अनवाणी 
खोल खोल गेले  डोळे  शोधून  पाणवठे
तळाला गेलेल्या विहीरी आणि माणूसकीही

निवडणूका आल्या की होतात चार घोषणा
 कायम स्वरुपी पाणी योजना, गंगा आली अंगणी वगैरे,वगैरे
टीआरपी कव्हरेजसाठी पोहोचतात हो टीव्हीवाले
केले जातात तात्पुरते हात ओले


एकीकडे उधळपट्टी, पैशाची चवड एकीकडे कायम परवड
कशी घालयाची सांगड ,कशी घालयाची सांगड
शहरी चैन आणि गावी सतत दैना
मिटण्या दृष्टी सृष्टी अंतर
देईल का कोणी अनोखा आईना ?
 












टिप्पण्या

Unknown म्हणाले…
संजय वळसंगकर
नंदू साध्यासुध्या शब्दात अथांग दडलाय अर्थ.खूपच छान आहे कविता.खूप आवडली.
Unknown म्हणाले…
पक्षी, पर्यावरण, गाव शहर, पैश्याची माज....सर्वांवर तळमळीने लिहिले आहेस.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
पी व्ही तुझा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला।असंच कळवीत राहा।
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री अशोक आफळे अभिप्राय तुमची कविता वाचली
पर्यावरणाचा सतत होत असलेला ऱ्हास परिणामी वाढते प्रदूषण निसर्ग चक्रात झालेले आणि सतत होत असलेले बदल घटत असलेली वनराई यामुळे पक्षी प्राणी जीवन धोक्यात आले वाडे गेले आणि सदनिका आल्या झाडे तोडली आणि पाखरे बेघर झाली पाणी पुरवठे आटले आहेत ते प्रदुशीत झाले कीटक नाशकांच्या फवारणीमुळे किडे सम्पले त्यामुळे पक्षी जीवन संकटात आले आहे त्यांची ही व्यथा तुम्ही अतिशय प्रत्ययकारी शब्दात अधोरेखित केली आहे
शब्दांची ठेवण रचना छान जमली आहे
अशोक आफळे कोल्हापूर
Unknown म्हणाले…
साध्या सोप्या शब्दांची कविताभर केलेली पेरणी मनाला भावली."साधयात आशय महर्षी कविताभर आहे.पर्यावरणाचा विषय छान हाताळला आहे.तसेच प्राण्यांबद्दल सहज आपुलकी व प्रेम दिसले.तुम्ही खूप गोष्टी एकत्र आणता हे मला विशेष जाणवले धन्यवाद.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी