निवडणुकीच्या उंबरठ्यावर....

निवडणुकीच्या उंबरठ्यावर....





कुणी निंदा अथवा वंदा

टोपी घालणं आणि बदलणं

हाच आमचा धंदा


घडलं काही विपरीत 

की एकमेकांकडे दाखवणं बोटं

हीच आमची रीत

 तुम्ही बसता बोटं मोडत

आम्ही असतो पत्रकारांपुढे बाता झोडत....

 सेटिंग कोण कोणाचं करतं

ज्याचं त्याला माहीत असतं 

समजता का आम्हाला वेडे ... खुळे ...

वाटतं तुम्हा चॅनलवरलं आणि पेपर मधलं

सारं खरं समजून चालत असतो आम्ही

..छे छे.

शाळेत शिकवलं होतं गणितामध्ये अगोदर असतो पक्ष

आणि मग असतं साध्य

इथे मात्र अगदी उलट

राजकारणाच्या गणितात आधी असतं साध्य

आणि मग असतो पक्ष


आल्या निवडणुका की

उत्तम प्रशासन, महिला आणि बाल कल्याण, बळीराजा आदि साऱ्या वर्गाची काळजी

ज्येष्ठांसाठी सवलती आणि मोफत बरच काही असं लिहिता जाहीरनाम्यात.

पाच वर्षाचा वायदा (बाजार) बहुमोल मत

द्याना यंदा 

करून देऊ तुमचा फायदाच फायदा .....

टोपी बदलणे हाच आमचा धंदा

कायद्यातून पळवाटा काढणं हाच आमचा वायदा.

 ओठावर गोड भाषा

चेहऱ्यावर लावून फेशियल

आणता चेरी हसू , 

कसं.... कसं....

एकदा दिलं ना मत 

मग वागू पूछो मत असं 


रंग बदलणारे सरडे आणि निष्ठावंत हे (नि)सरडे

 निसर्गातील सरडे त्यांची भूक माफक जरुरीपूरती

आणि हे (नि)सरडे यांची भूक अनंत पिढयानपिढ्या घरी बसून खातील इतकी.

 

पांढरेच हे बगळे 

पेन्शन , कोट्यातील घरे, फुकट विमान प्रवास फुकट

पंचतारांकित आरोग्य सुविधा अशा सवलतीच बिलं मांडल की एकत्र होतात सगळे.


मागील निवडणुकीत अशा मुजोराना दिलं असेल मत

 तर आता करा प्रश्नांची सरबत्ती

वाचून दाखवा त्यांची अधोगती

पळता भुई थोडी होईल त्यांची

लोकशाहीची थट्टा कां म्हणून आम्ही सहन करायची ?

सदा हात जोडून बोलता हसत हसत

लक्षात ठेवा आम्ही नाही नेहमी फसत

करू नका जास्त गमजा

देऊ आम्ही कडक सजा

करून नका जास्त थट्टा

जनता जनार्दन देईल

मतपेटीतून जोराचा रट्टा !


विंदानी म्हणलं देणाऱ्यानं देत जावं

देता देता घेणाऱ्यांचे हात घ्यावेत..

यांना मात्र मतपेटीतून

हातावर द्या त्यांच्या स$$ सपकन छडी 

खडसावून विचारा

किती फसवलं घडो घडी ?

तुकोबा म्हणतात 

ऐशा नरा मोजून 

मारा पैजरा !

 लावलीत ना लोकशाहीची वाट

आम्ही दाखवू आता कात्रजचा घाट

मतदान करायचं ते नाही चुकवायचं

दगडापेक्षा विट मऊ म्हणायचं .....


नंदकिशोर लेले



Add reaction

टिप्पण्या

Mahesh Lele म्हणाले…
अगदी खरय.... छानच लिहिले आहे
अनिल पाठक म्हणाले…
सध्याची राजकारणाची वास्तवता छान सांगीतली
अशोक परांजपे म्हणाले…
राजकारणाच्या चिखलावर उत्तम भाष्य आणि मतदारांना सुयोग्य सूचना. मस्त काव्य नंदकिशोरजी.
विजय रणसिंग म्हणाले…
अतिशय वास्तववादी कविता
छान श्री नंदकुमार जीं लेले साहेब 👌🏻
अनामित म्हणाले…
अगदी खरं ��
वास्तववादी मार्मिक काव्य
Manisha Mehendale म्हणाले…
व्वा,छान खुसखुशीत जमलय कवितेच रसायन!
नेहमीप्रमाणेच छान मांडलेत विचार...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी