शब्दांकुर...

// श्री शारदा देवी प्रसन्न //

शब्दांकुर..

समर्थ रामदासांनी ग्रंथराज दासबोधामध्ये प्रथम दशक समास सातवा  यात कवेश्वरस्तवन लिहलं आहे.
कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असं त्यांनी संबोधलं आहे .
आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर । 
नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥

कविता अथवा काव्य कसे काय सुचते , काव्य प्रक्रिया कशी असते असे बरेच जणांना कुतूहल असते. वास्तविक कवी अथवा लेखक हा सर्वसामान्य माणसांसारखाच जगात वावरत असतो परंतु जगात चालणाऱ्या हालचाली, वस्तू यांच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी थोडी वेगळी असते. कविस व लेखक यास ही निसर्गदत्त देणगी असते . आपल्या स्वानुभवातून, अवलोकनातून, आकलनातून व परकाया प्रवेश करून त्याला सामान्य गोष्टीत ही काहीतरी वेगळं दिसतं त्याच्या हृदयी ते भिडतं  आणि ते अनावर स्फूर्तीने कवितेतून व्यक्त होत जातं -जणू काव्य रुपी बीजांना शब्दरूपी अंकुर फुटतो. हेच भाव व्यक्त करणार माझं हे काव्य.

शब्दांकुर  ...  नंदकिशोर लेले

काव्य उमगे मनी कसे ?
पृच्छा करी रसिक
वदे कवी ....
पाहिलं का कोणी

बीज रुजताना धरणीत
नदी उगम डोंगरात
वारा कसा हवेत
मध सुगंध कसा सुमनात

कसा मोती शिंपल्यात
पान्हा माते हृदयात
हास्य उमले बाल गाली पाळण्यात
कसे कधी डोळे पाणावतात
 कसा  राउळी नाद घंटेत 
सद्गुरु वसे शिष्यात

फिरे रात्रंदिन अवनी, सुखदुःख भिडे कवी हृदयी
तोच क्षणी काव्य उमले मनी
उसंत मिळता अवतरे कागदावरी 









टिप्पण्या

पराग लेले म्हणाले…
अगदी ख़रय खुप छान मांडलय
Kshama Paranjape Ganu म्हणाले…
खूप सुंदर लिहिलं आहे....

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी