झरोका....






परवा मला एक मित्र म्हणाला कशी असते प्रेम कविता

मी त्याला म्हटलं कवितेनं माझ्यावर प्रेम केलं , फिदा आहे ती माझ्यावर माझा दिवस जातो आनंदात

तरीपण तू म्हणतोच आहेस तर ऐकवतो थोडंस.

शाळेत असती ती कैरीच्या फोडी सारखी ,

लाल हिरवी बोरांसारखी सारखी आंबट-गोड,

राय आवळ्यासारखी तुरट,

लाल लाल बदाम गोड झाडा वर दगड मारून पाडणारी,

दप्तर पाठीवर अडकून गळ्यात गळ्यात घालून चालणारी

एकमेकाची खोडी काढणारी , म्हातारीच्या झाड्वरील कणसं काढून पिसं हवेत उडवणारी,

रावळगाव चॉकलेट , चिंगम चघळणारी अगदी निरागस

तर दहावी अकरावीत तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यातून नजरानजर

आणि जिन्यावरून जाता-येता , ट्युशनला जाताना सहवास वाढवायचा प्रयत्न करणारी थोडी भाबडीच ,

कॉलेजमध्ये मात्र जरा समजून उमजून वही पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी,

वाढदिवस निमित काढून भेट वस्तू देत घेत, कॅन्टीन मध्ये भेटणारी

ट्रीपच्या आठवणीत रमणारी.. क्याडबरी सारखी.. तर पुढे पदवीनंतर ही स्टोरी फारच क्वचित पूढे सरकते...

नवीन वाटा फुटतात उच्च शिक्षण घेत असताना,सुरवातीचं अर्थार्जन करताना नदीकिनारी पाण्यात पाय टाकून बसणारं समंजस अशीही वाहते ही प्रेमसरिता मात्र काहीजणांकरीताच . काहीजणांचं होतं लव मॅरेज, काहीजणांचं टिकत लव मॅरेज तर काहीजण टिकवतात लव्ह मॅरेज चिक्की सारखं कडा कडा फोडून खात..

प्रेमानंतरच लग्न आणि लग्नानंतरचे प्रेम असं बदलत जात सारं.. जीवन प्रवासातील कडू-गोड अनुभव बरच काही शिकवून जातात.. पाखरं उडून जातात... संध्याछाया भिववू लागतात. अवयव बोलू लागतात..

विरळचं असत रे मोरावळ्या सारखं मुरलेलं जीवनरस पाझरणारं प्रेम ...

अरे पण एवढेच नसतं जग आजुबाजुवरील माणसांवर, त्यांच्या गुणांवर, प्रेम करत राहायचं निराश नाही व्हायचं आपण... पुस्तक वाचन, संगीत, निसर्ग न्याहाळत जुन्या मित्रांना भेटून नवीन मैत्री करून , हसत हसत आपले छंद जोपासत प्रेम गीत गात राहायचं जीवनावर प्रेम करायचं अंगावर वर पहाट वारा घेत राह्यचं,तृणपात्यवरील दवबिंदू पहात, अरुण प्रभा पहात कोवळं ऊन अंगावर घेत ,डुलणारी पाने फुलं पहात ,तनमनाला ताजं ठेवत राहायचं,थंड हवा पडली की मऊ मऊ गरमागरम तूप मेतकूट भात, आपलं आवडतं लोणचं, भाजलेला पापड ,तर कधी मस्तं readymade Hot and Sour सूप,कधी डाळ खिचडी, आणि कढी भुरकत राहायचं, उन्हाळ्यात मस्तं आमरस, कैरीचा गोड आंबट मधुर तक्कू आस्वाद घेत राहायचं आणि तेवढ्यात नातवंडना घेऊन येत आहे असा मुलांचा/ मुलीचा मोबाइल आला की त्यांच्या style ने कान व मानेत पकडून गोड गप्पा मारायच्या आणि पुढील काही तास त्या संभाषणच्या आठवणीत रमून जायचं. तेंवढ्यात आहो अशी कान येतेच आणि अहो तुमच्या सतीशच्या नातीच्या बारसं आहे परवा अगदी आग्रहाचं आमंत्रण आहे कपडे आणले का इस्त्री वाल्याकडून असं कानावर आलं की पुन्हा एक आनंदाची भरारी घायची...पेट्रोल भरुन यायचं गाडीत , येताना वर्गमित्र आणि शेजारी विनयच्या दारातून डोकव्यायच हाल हवाल घायची, थत्ते काकांना रविवार लोकसत्ता आणून द्यायचा..

अरे हो या थत्ते काकांच्या विषयी सांगायलाच हवं...

थत्ते काका-काकू अपार्टमेंट मध्ये सर्वात आधी राहायला आले. काका सोसायटीचे काम पाहत असल्याने सर्वांचाच त्यांचा चांगला परिचय आहे . नाटकाची भारी आवड काका स्वतः नाटक लिहितात दिग्दर्शन करतात काकू कामही करतात . काकूंना पेटी ची आवड असल्याने ज्यांना पेटी शिकायची इच्छा आहे त्यांना मोफत शिकवतात. अगदी सिक्युरिटी गार्डची मुलंसुद्धा त्यांच्याकडे शिकायला येतात. सहा महिन्यापुर्वीच काकांना अर्धांगवायूचा झटका आला त्यातून ते व्यायाम करून सावरले परंतु बाहेरचे वावरणे यावर मर्यादा आल्या. मी गेलो त्यावेळी काकू च्या घरातल्या फळ्यावर साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 'ही कविता लिहिलेली होती आणि अपार्टमेंटमधील छोट्यामुला-मुलींना २६ जानेवारी साठी सादरीकरण करण्यासाठी ती कविता त्या म्हणून घेत होत्या. टेबलावर श्री ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो आणि त्याला घातलेला सुंदर प्राजक्ताच्या फुलांचा हार पाहून मी अंतर्मुख झालो. ज्ञानेश्वर माऊलीला कधी प्राजक्ताच्या फुलांचा हार तर कधी अबोली तर कधी चाफा असं सदैव मन प्रसन्न करणारे चित्र त्यांच्या घरी पाहायला मिळायचे. पूर्वी काका ही फुले आणत असत पण आता अपार्टमेंटमधील मंडळीच कुणी ना कुणीतरी त्यांना हे आठवणीने पोहोचत करतं.

टेबलावर स्वरूप संप्रदाय पावस यांचा ताजा अंक आला होता त्यातल्या एका पानाच्या वरील Quotation असं होतं Habits come as visitors stay as guests and rule as masters.

काका काकूनी सर्वाना प्रेमानं आपलसं केलं होतं वरील वचन ते जगत होते.

'अंतर्यामी सूर गवसला ' श्रीनिवास खळे यांचे श्री दत्ता मारुलकर यांनी लिहिलेले चरित्र आणि औषधं काकांच्या हातात ठेवली काका म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघितले ...अरे या वेदना हरी बाम पेक्षा या पुस्तकातील लेखच माझ्या वेदना कमी करतील. खूप दिवस झाले हे पुस्तक मला हवे होते. मी पटकन दार लोटून निघायच्या बेतात असताना सौ काकूनी अरे मोहन ...थांब... तिळगुळ वडी खाऊन जा असा आवाज दिला. आमच्या रोहिणीच्या शेजारच्यानी केल्या आहेत . करोना पश्चात आर्थिक ओढाताण अजूनही सुरू आहे अनेकांची त्यातलीच ही एक . कुणाला हवा असल्यास जरूर सांग तेवढीच मदत होईल बिचारीला. पटकन तिळगुळाची वडी मी तोंडात टाकली. तिळगुळ चव जिभेवर रेंगाळत राहिली. काकू निघतो आता नाहीतर हिचा इंटरकॉम यायचा तुमची मैत्रीण धाक्रस बाईंची मुलगी आहे ती खूप धाक आहे तिचा.

तर मित्रा मनातली आणि घरातली खिडकी सतत उघडी ठेवायची रें, झुळूझुळू वारा सांगून येत नाही त्याकरिता सतत झरोका उघडा ठेवायाचा रे ...मग

मंजूळ बासरी ऎकू येतेच ...

...ये जीवन हैं, इस जीवनका यही हैं रंग रूप....

टिप्पण्या

जयंत कुलकर्णी म्हणाले…
फार सुंदर ओघवते लिखाण आहे. एकाच लेखामध्ये जीवनाच्या अनेक रंगांचा गंधांचा नात्यांचा वेध घेतला आहे. "पहला घंटा बचपन दुसरा जवानी तिसरा बुढापा है...." अगदी सगळं सगळं. असेच लिहित रहा आणि ते वाचून आमचे जीवन समृद्ध होऊद्या! शुभेच्छा लेलेसाहेब.
विजय रणसिंग म्हणाले…
लेले साहेब खूप सुंदर लिहिलंय. लहानपणापासून ते आता पर्यंत चा तुम्ही लिहिलंय त्याप्रमाणे सर्व आठवतंय. खूपच छान 👍धन्यवाद
अनामित म्हणाले…
खुप छान.
रमाकांत कस्तुरे म्हणाले…
सुंदर...
Unknown म्हणाले…
खूप छान काका.!👌👌👏🤗

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी