आदिमाता

 //श्री सरस्वती प्रसन्न//

आदिमाता

ठाई ठाई तुझे दिव्य रूप

तू सृजनशक्ती , तू अखंड संजीवक, ऐश्वर्य समृद्धी वरदायिनी, तू शक्तिदायी तू बुद्धिदेवता

तू प्रेरक ,तू तारक, तू दयाळू कृपाळू जनांसी आधारु

तू दुर्गा तू भगवती तू योगेश्वरी चामुंडा चंडिका तू शाकंभरी तुळजाभवानी तू रेणुका सप्तशृंगी तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ,तू वैष्णव देवी, तू गावदेवी, चतुर्श्रुंगी,

असशी घरोघरी तू अन्नपूर्णा

अनंत अगाध रुप महिमा वर्णती सारे कवीगण संतजन

परी आहेस खरोखरी तू आदिमाता जगतजननी

प्रकृती व पुरुष यातील प्रकृती

येता नवरात्रोत्सव हर्षती आनंदती सारे भक्तजन ,

होता आगमन ,सळसळे उत्साह दाही दिशातूनी

मंगल वार्ता कानी पडे, विशेष संतोष पावती माता-भगिनी

व्रतस्थ राहती भक्तजन ,उपासती तुज नानाविध अंगी

आस तुझ्या दर्शनाची तासन तास उभे राहती रांगेतूनी

अनुसरूनी कुलाचार प्रथा-परंपरा घरोघरी अन राउळी षोडपचार पूजा

रूप कांती उजळती झेंडू शेवंती माला अन

अखंड रात्रंदिन प्र्ज्वले समई नंदादीप

सप्तशती पूजा पाठ, श्रीसूक्त, देवी,भागवत देवी स्तुती

गजर तुझ्या नामाचा ओठी हर एक प्रहरी

नवरात्र पुरवी ऊर्जा वर्षभरी,उजळी अंतरीचा दिप

नमितो नंदकिशोर विनितो तुजला,

सुखी ठेव सर्व प्राणिमात्रा

सदा राहू दे विवेक जागृत

जिंकाया षडरिपू बळ दे आम्हा

आशीर्वच तव मागतो पुन्हा पुन्हा भवसागरी तराया

अर्पितो अनन्य भक्तिभावे जगदंबा माते तवचरणी हे काव्य सुमन...

टिप्पण्या

Kshama Paranjape Ganu म्हणाले…
सुंदर कविता👌👌
हिमवान म्हणाले…
Hide quoted text

---------- Forwarded message ---------
From: Nandkishor Lele
Date: Mon 25 Oct, 2021, 7:25 AM
Subject: Re: आदिमाता देवी स्तवन
To: Padmakar Bondale
Cc: Jayant Kale

नमस्कार, आपला आशीर्वादपर अभिप्राय वाचून आनंद झाला. Please खालील माझ्या ब्लॉगवर नोंद करावा ही विनंती. लिंक अशी आहे. आपला ब्लॉग लवकरच तयार करुया वेळ बघा कधी मिळेल .https://nandkishorslele.blogspot.com/2021/10/blog-post.html?m=1 कळावे नंदू

On Sun, 24 Oct, 2021, 10:56 pm Padmakar Bondale, wrote:
स्तोत्र हे वाचिले मोदे
दुर्गास्तूती परोपरी
रचनेतून देवीचे रूप दर्शन होतसे
भक्तीने स्फुरले काव्य 
देवी कृपा अलौकिक 
दिव्य हे पर्व जाणावे
भक्तीमाहेर गोमटे, 
अंतरी शारदादेवी, विश्व सांभाळ ती करी
पितृपुण्ये, पुण्यकर्मे लाभले भाग्य हे तुवा
लाभो दीर्घायु आरोग्य प्रार्थना देवी मंगले
जगदम्ब उदयोsस्तु!!! 
कल्याणमस्तु 
श्रीराम 

On Sun 24 Oct, 2021, 12:29 AM Nandkishor Lele, wrote:

नमस्कार

नवरात्र उत्सव नुकताच संपन्न झाला 2013 सालच्या नवरात्र उत्सवात हे काव्य सुरुवातीस सुचले होते आज पूर्णत्वास गेले ते सादर करीत आहे

//श्री सरस्वती प्रसन्न//

आदिमाता

ठाई ठाई तुझे दिव्य रूप

तू सृजनशक्ती , तू अखंड संजीवक, ऐश्वर्य समृद्धी वरदायिनी, तू शक्तिदायी तू बुद्धिदेवता

तू प्रेरक ,तू तारक, तू दयाळू कृपाळू जनांसी आधारु

तू दुर्गा तू भगवती तू योगेश्वरी चामुंडा चंडिका तू शाकंभरी तुळजाभवानी तू रेणुका सप्तशृंगी तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ,तू वैष्णव देवी, तू गावदेवी, चतुर्श्रुंगी,

असशी घरोघरी तू अन्नपूर्णा

अनंत अगाध रुप महिमा वर्णती सारे कवीगण संतजन

परि आहेस खरोखरी तू आदिमाता जगतजननी

प्रकृती व पुरुष यातील प्रकृती

येता नवरात्रोत्सव हर्षती आनंदती सारे भक्तजन ,

होता आगमन ,सळसळे उत्साह दाही दिशातूनी

मंगल वार्ता कानी पडे, विशेष संतोष पावती माता-भगिनी

व्रतस्थ राहती भक्तजन ,उपासती तुज नानाविध अंगी

आस तुझ्या दर्शनाची तासन तास उभे राहती रांगेतूनी

अन
हिमवान म्हणाले…
स्तोत्र हे वाचिले मोदे
दुर्गास्तूती परोपरी
रचनेतून देवीचे रूप दर्शन होतसे
भक्तीने स्फुरले काव्य
देवी कृपा अलौकिक
दिव्य हे पर्व जाणावे
भक्तीमाहेर गोमटे,
अंतरी शारदादेवी, विश्व सांभाळ ती करी
पितृपुण्ये, पुण्यकर्मे लाभले भाग्य हे तुवा
लाभो दीर्घायु आरोग्य प्रार्थना देवी मंगले
जगदम्ब उदयोsस्तु!!!
कल्याणमस्तु
श्रीराम

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी